Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : इराण युद्धात अमेरिका बॅक फुटवर! १० दिवसांतच ट्रम्प यांचा सूर बदलले; सत्तापालटाचा गेम फसला?

US Iran War Update : अमेरिका इराण युद्धाने आता नवे वळण घेतले आहे. ट्रम्प यांनी काही दिवसांतच युद्ध संपवण्याची घोषणा केली आहे. ज्यामुळे ट्रम्प इराण युद्धातून माघार घेत असल्याचे म्हटले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 10, 2026 | 03:18 PM
इराणविरोधी कारवाईत ४८ तासांत अमेरिकेचे निघाले दिवाळे; तब्बल इतक्या कोटींचा खर्च 

इराणविरोधी कारवाईत ४८ तासांत अमेरिकेचे निघाले दिवाळे; तब्बल इतक्या कोटींचा खर्च 

Follow Us
Follow Us:
  • इराण युद्धात अमेरिका बॅक फुटवर
  • युद्ध लवकरत संपेल – ट्रम्प
  • अमेरिका अपयशी ?
US Iran War News in Marathi : वॉशिंग्टन : गेल्या महिन्यात २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिकेने इराण(Iran) वर हल्ला चढवला होता. इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त करु अशी धमकीही त्यांनी दिली होती. आता मात्र ट्रम्प १० दिवसांतच बॅकफुटवर येताना दिसत आहेत. नुकतेच डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी थोड्याच दिवसांतच संघर्ष संपेल अशी घोषणाही केली आहे. इराणमध्ये सत्तापालटासाठी सुरु केलेले युद्ध आता अमेरिकेसाठीच डोकेदुखी ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

US Iran War : ‘तेलाचा एक थेंबही नेऊ देणार नाही…’ , अमेरिकेच्या धमकीवर इराणचं आर-पार उत्तर; आता काय करणार ट्रम्प?

सल्लागारांचा धोक्याचा इशारा

मिळालेल्या माहितीनुसार ट्रम्प यांना त्यांच्या सल्लागारांनी इराणसोबत शांततेने संवाद साधून तणाव कमी करण्याचा सल्ला दिला आहे.
मंगळवनारी (१० मार्च) ‘युद्ध समाप्तीचेही संकेत त्यांनी दिले आहेत. वॉल स्ट्रीट जनरलने दिलेल्या वृत्तानुसार, युद्ध दीर्घकाळ सुरु राहिल्यास
थेट अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता आहे.

शिवाय या वर्षाच्या शेवटी अमेरिकिते निवडणुका प्रस्तावित आहेत. युद्ध थांबले नाही तर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातील लोक नाराज होऊ शकता असा इशार त्यांच्या सल्लागारांनी दिला आहे. या युद्धातून अमेरिकेला लष्करी किंवा आर्थिक फायदा होत नसल्याचे ट्रम्प यांच्या सल्लागारांनी म्हटले आहे. यामुळेच ट्रम्प यांनी युद्ध लवकरच संपेल अशी घोषणा केली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

इराणमध्ये सत्तापालटाचा प्रयत्न फसला ?

या युद्धात अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. शिवया इराणचे अनेक वरिष्ठ कमांडरही ठार करण्यात आले होते. मात्र यानंतर इराणने शरणागती पत्करलेली नाही. शिवाय खामेनेई यांची सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न देखील फसला आहे. इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून खामेनई यांच्या धाकट्या मुलाची मोजतबा खामेनेईची निवड करण्यात आली आहे. तसेच इराणची जनता देखील रस्त्यावर उतरलेली नाही. यामुळे ट्रम्प यांचा सत्तापालटाचा गेम फसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

वाढता आर्थिक बोजा

मीडिया रिपोर्टनुसार, अमेरितेने इराण युद्धात सुरुवातीच्या दनो दिवसांतच ५. ६ अब्ज डॉलर्सचा दारुगोळा वापरला होता. १० दिवसांत अमेरिकेने या युद्धावर १० अब्ज डॉलर्सहून अधिक खर्च केला आहे. शिवाय जागतिक इंधन पुरवठा ठप्प झाल्याने देशातही इंधन दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे अमेरिकेला मोठा आर्थिक फटका बसत आहे. शिवाय देशांतील ५३% नागरिकांनी इराणवरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

एकूणच इराण युद्धामुळे अमेरिकेला कोणताही फायदा झालेला नाही, उलट देशांतर्गत ट्रम्प प्रशासनाविरोधात नाराजी वाढत आहे. याशिवाय आर्थिक फटकाही बसत आहे. तसेच लष्कराचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे ट्रम्प माघार घेत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Global Oil Politics : पुतिन यांच्याशी चर्चा अन् ट्रम्प मवाळ! रशियन तेलावरील निर्बंध हटवणार? भारतासाठी मोठे संकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिका इराणसोबत वाद सोडवण्याचा विचार का करत आहे?

    Ans: इराणवरील हल्ल्यानंतर १० दिवसांत अमेरिकेला मोठा आर्थिक फटला बसला आहे. तसेच येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासन राजकीयदृष्ट्या अडचणीतही येऊ शकते यामुळे युद्ध संपण्यावसाठी ट्रम्प धडपड करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

  • Que: इराण युद्धावर अमेरिकन नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिली ?

    Ans: मीडिया रिपोर्टनुसार, सुमारे ५३% अमेरिकेन नागरिकांनी इराणवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. अमेरिका इस्रायलला गरजेपेक्षा जास्त समर्थन देत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

Web Title: Middle east war us iran conflict donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Dubai Jobs : दुबई उघडणार 20,000 इराणींसाठी दरवाजे; अमिरातीची इराणला शांतता कराराची ‘अशी’ नवी भन्नाट ऑफर
1

Dubai Jobs : दुबई उघडणार 20,000 इराणींसाठी दरवाजे; अमिरातीची इराणला शांतता कराराची ‘अशी’ नवी भन्नाट ऑफर

Ukraine War: युक्रेनच्या आकाशात थरार! मोहिमेदरम्यान F-16 विमानावरील नियंत्रण सुटले; अपघाताचे कारण शोधणे सुरू
2

Ukraine War: युक्रेनच्या आकाशात थरार! मोहिमेदरम्यान F-16 विमानावरील नियंत्रण सुटले; अपघाताचे कारण शोधणे सुरू

Gaza : गाझामध्ये इस्रायली हवाई हल्ल्याचा थरार! अल-मुत्ताकीन मशीद जमीनदोस्त; हमासचे शस्त्रागार असल्याचा IDFचा दावा
3

Gaza : गाझामध्ये इस्रायली हवाई हल्ल्याचा थरार! अल-मुत्ताकीन मशीद जमीनदोस्त; हमासचे शस्त्रागार असल्याचा IDFचा दावा

Russia-Ukraine War: रशियाच्या भीषण क्षेपणास्त्र वर्षावाने कीव थरारले; झेलेन्स्कींचा अंदाज अचूक, शहरांमध्ये विनाशाचे तांडव
4

Russia-Ukraine War: रशियाच्या भीषण क्षेपणास्त्र वर्षावाने कीव थरारले; झेलेन्स्कींचा अंदाज अचूक, शहरांमध्ये विनाशाचे तांडव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.