
Arctic conflict
मिळालेल्या माहितीनुसार, डेन्मार्कच्या विनंतीवरुन स्वीडन, नॉर्वे, जर्मनी, फ्रान्स, नीदरलँड्स, आणि कॅनडाने ग्रीनलँडमध्ये आपले लष्कर पाठवले आहे. नाटो देशांची ही तैनाती डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवरील ताबा घेण्याच्या निर्णयाला थेट आव्हान मानले जात आहे.यामुळे अमेरिका आणि नाटो देशांमध्ये आंतरराष्ट्रीय तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
सगळ्यात आधी डेन्मार्कने अमेरिकेविरोधात सैन्य तैनाती सुरु केली होती. यानंतर स्वीडनने देखील डेन्मार्कमध्ये सैन्य तैनातीची घोषणा केली. याच पाठोपाठ नॉर्वे, जर्मनी, फ्रान्सने १३ सैनिकी तुकड्या पाठवल्या आहेत. याचा उद्देश ग्रीनलँडची सुरक्षा, समुद्री सुरक्षा आणि आर्कटिकमधील संभाव्य धोके टाळणे आहे. सध्या या सैन्याचा अभ्यास सुरु असून याला डेन्मार्कने ऑपरेशन आर्कटिक एड्योरंस असे नाव दिले आहे. यामध्ये सैनिकांना सामूहिक सुरक्षा, समुद्री सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरुन येणाऱ्या संभाव्य हाल्ल्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.
ग्रीनलँडमध्ये नाटो देशांच्या सैन्याची उपस्थितीने डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा झटका बसला आहे. ग्रीनलँड हा डेन्मार्कच्या नियंत्रणाखालील स्वतंत्र भाग आहे. यावर ताबा मिळवण्याचा ट्रम्प प्रयत्न करत होते. परंतु यामुळे नाटो देशांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व युरोपीय नाटो देशांनी ट्रम्पच्या ग्रीनलँडवरील नियंत्रणाला तीव्र विरोध केला आहे. आर्कटिकमध्ये वाढत चालले तणाव आणि नाटो देशाची उपस्थिती अमेरिकेसाठी धोकादायक ठरत आहे. परंतु नाटोने स्पष्ट केले आहे की, ही सैन्य तैनाती अमेरिकेला हानी पोहचवण्यासाठी नव्हे तर ग्रीनलँडच्या संरक्षणासाठी आहे.
ग्रीनलँड म्हणजेच आर्कटिक प्रदेशा हा नैसर्गिक साधनसंपत्तींनी समृद्ध आहे. याचे समुद्री मार्गाचे आणि भू-राजकीय महत्त्व वाढत चालले आहे. शिवाय भविष्यात धोरणात्मक बदलांमुळे देखील अमेरिकेला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. यामुळे ट्रम्प यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तर ट्रम्प यांनी भविष्यात रशिया आणि चीन यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी आणि अमेरिकेच्या सुरक्षेसाठी ग्रीनलँड गरजेचा असल्याचे म्हटले आहे.
Greenland Dispute : अमेरिकन महासत्तेला डेन्मार्क देणार टक्कर? जाणून घ्या किती आहे सैन्य शक्ती?
Ans: डेन्मार्कच्या विनंतीवरुन आर्कटिकमधील सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि ग्रीनलँडवरील संभाव्य अमेरिकी हल्ल्याविरोधात नाटो देशांनी ग्रीनलँडमध्ये तैनाती केली आहे.
Ans: नाटो देशांच्या ग्रीनलँडमध्ये सैन्य तैनातीमुळे ग्रीनलँड ताब्यात घेण्याच्या ट्रम्पच्या स्वप्नाला धक्का बसला आहे. नाटो देशांनी असे करुन ट्रम्पच्या ग्रीनलँडवरील नियंत्रणाला थेट विरोध दर्शवला आहे. यामुळे अमेरिका आणि नाटो देशांमध्ये राजकीय तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
Ans: डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते, ग्रीनलँड हा अमेरिकेच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा देश आहे. भविष्यात रशिया किंवा चीन यावर नियंत्रण घेऊ शकतात यामुळे ट्रम्प यांनी ग्रीनलँड हवे आहे.
Ans: तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ग्रीनलँड हा खनिजे आणि नैसर्गिक साधनसंपत्तीने विकसित देश आहे. शिवाय याभागातून बर्फ वितळल्यामुळे समुद्रीमार्गावरुन आंतरराष्ट्रीय व्यापार प्रवास अधिक सोपा आणि जलद आहे. यामुळे ट्रम्प यांनी ग्रीनलँड हवे आहे.