Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India China Update : ‘अरुणाचल आमचा होता, आहे आणि राहील…’; चीनच्या मनमानीवर भारताचा मात्र ठाम पवित्रा; जरी केला डिमार्च

Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशातील नागरिक पेमा यांना शांघाय विमानतळावर ताब्यात घेतल्याबद्दल भारताने तीव्र निषेध केला. चीनने तो पासपोर्ट अवैध घोषित केला, तर भारताने ते आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 26, 2025 | 08:44 AM
Arunachal is ours India stands firm against China’s claims

Arunachal is ours India stands firm against China’s claims

Follow Us
Close
Follow Us:
  • अरुणाचल प्रदेशातील भारतीय नागरिक पेमा वांगझोम यांना शांघाय विमानतळावर १८ तास ताब्यात ठेवत चीनने त्यांचा पासपोर्ट अवैध ठरवला.
  • भारताने तातडीने हस्तक्षेप करून डिमार्च जारी केला आणि अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचा ठाम पवित्रा घेत तीव्र निषेध नोंदवला.
  • चीनने उलट दावा करत अरुणाचल हा चीनचा भाग असल्याचे पुन्हा सांगितले, तर भारताने आंतरराष्ट्रीय प्रवास नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट केले.

Arunachal Pradesh dispute : अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) रहिवासी आणि भारतीय नागरिक पेमा वांगझोम यांना शांघाय विमानतळावर अवघ्या ट्रान्झिटच्या प्रवासादरम्यान जवळपास १८ तास ताब्यात ठेवण्यात आल्याच्या प्रकरणाने भारत–चीन(India-China) तणावाला नवे वळण दिले आहे. लंडनहून जपानला जात असलेल्या पेमांना चीनच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा भारतीय पासपोर्ट “अवैध” ठरवत थांबवले आणि चौकशीच्या नावाखाली स्वतंत्र कक्षात धरून ठेवले. या धक्कादायक प्रकारानंतर भारताने त्वरित कारवाई करून चीनकडे औपचारिक निषेध अर्थात ‘डिमार्च’ जारी केला. भारताने स्पष्ट इशारा दिला की चीनने वस्तुस्थितीला नकार देऊन वास्तविकता बदलत नाही.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की पेमा वांगझोम यांचा पासपोर्ट पूर्णपणे वैध असून त्या कायदेशीररीत्या प्रवास करत होत्या. त्यांचा शांघायमध्ये फक्त तीन तासांचा ट्रान्झिट होता. मात्र, चिनी अधिकाऱ्यांनी त्यांच्या पासपोर्टवर ‘अरुणाचल प्रदेश’ जन्मस्थान नमूद असल्याचे कारण देत त्यांना ताब्यात घेतले. भारताने याला स्पष्ट मनमानी कारवाई ठरवत चीनला कठोर शब्दांत उद्देशून म्हटले की अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य आणि अविभक्त भाग आहे. तेथील प्रत्येक नागरिकाला भारतीय पासपोर्ट बाळगण्याचा आणि जगात कुठेही प्रवास करण्याचा पूर्ण अधिकार आहे.

हे देखील वाचा : Constitution Day 2025 : भारतीय संविधानातील सर्वात शक्तिशाली कलम कोणते? जाणून घ्या त्याची खरी ताकद

भारताच्या म्हणण्यानुसार, चीनची ही कृती आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास नियमांचेही उल्लंघन करते. कारण चीनच्या स्वतःच्या धोरणानुसार, सर्व देशांच्या नागरिकांना २४ तासांसाठी व्हिसा-मुक्त ट्रान्झिटची परवानगी देण्यात येते. त्यांनी या धोरणालाच हरताळ फासत पेमांना जवळपास १८ तासांसाठी ठेवले. या काळात त्यांना दडपणाखाली प्रश्न विचारले गेले आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले, असे पेमांनी सोशल मीडियावर सांगितले. तीन तासांचा प्रवास त्यांच्या आयुष्यातील ‘भयानक अनुभव’ ठरला.

Our response to media queries on statements made by the Chinese Foreign Ministry⬇️
🔗 https://t.co/3JUnXjIBLc pic.twitter.com/DjEdy7TmTK
— Randhir Jaiswal (@MEAIndia) November 25, 2025

credit : social media

भारताने घटनेची माहिती मिळताच तातडीने पेमाशी संपर्क साधला. यूकेमधील एका मैत्रिणीच्या मदतीने पेमा भारतीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू शकल्या. शांघायमधील भारतीय दूतावास व वाणिज्य दूतावासाने तत्काळ हस्तक्षेप केला आणि रात्री उशिरा त्या चीन सोडण्यात यशस्वी झाल्या. भारताच्या कारवाईने चीनवर दबाव निर्माण झाला असून या प्रकरणावर भारताची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे की, कोणताही देश अरुणाचलचे अस्तित्व कागदोपत्री बदलून वास्तवावर परिणाम करू शकत नाही.

हे देखील वाचा : Science News: विज्ञानात 100 वर्षानंतर क्रांती! ब्लॅकहोलच्या टक्करीनंतर ऐकू आला ‘रिंगडाउन’ सिग्नल; समजून घ्या यामागील तथ्य

भारताच्या निषेधानंतर चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी प्रतिक्रिया देताना पुन्हा दावा केला की ‘झांगनान’ म्हणजेच अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग आहे. त्यांनी तपासणी कायदेशीर होती, पेमांना विश्रांती आणि जेवण दिले, असे म्हटले. मात्र पेमा वांगझोम यांच्या प्रत्यक्ष अनुभवाने चीनचे हे दावे फोल ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की चीन कितीही वेळा नकाशे, नावे किंवा राजकीय दावे बदलले तरी अरुणाचल प्रदेश भारताचाच भाग राहणार आहे. आणि तेथील नागरिकांना कोणताही देश अशाप्रकारे त्रास देऊ शकत नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पेमा वांगझोम यांना चीनमध्ये का थांबवले?

    Ans: त्यांच्या पासपोर्टवर अरुणाचल प्रदेश जन्मस्थान असल्याने चीनने तो अवैध ठरवला.

  • Que: भारताने चीनकडे काय कारवाई केली?

    Ans: भारताने तीव्र निषेध नोंदवत औपचारिक ‘डिमार्च’ जारी केला.

  • Que: अरुणाचल प्रदेशाबाबत भारताची भूमिका काय आहे?

    Ans: अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य आणि कायदेशीर भाग आहे.

Web Title: Arunachal is ours india stands firm against chinas claims

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 08:44 AM

Topics:  

  • Arunachal pradesh
  • China
  • india
  • International Political news

संबंधित बातम्या

Cyclone Senyar: सावधान! पुढील आठवडाभर ‘या’ राज्यात पावसाचा ‘भीषण’ प्रकोप, अनुभवणार अतिवृष्टी आणि विजांचा कडकडाट!
1

Cyclone Senyar: सावधान! पुढील आठवडाभर ‘या’ राज्यात पावसाचा ‘भीषण’ प्रकोप, अनुभवणार अतिवृष्टी आणि विजांचा कडकडाट!

खवय्यांनो लक्ष द्या! Zomato-Swiggy चे खाणे महागणार? नवा लेबर कोड ठरू शकतो दरवाढीचे कारण
2

खवय्यांनो लक्ष द्या! Zomato-Swiggy चे खाणे महागणार? नवा लेबर कोड ठरू शकतो दरवाढीचे कारण

India-Canada Uranium Deal: कॅनडा-भारत मेगा युरेनियम डील! तब्बल  २.८ अब्ज डॉलरचा करार अंतिम टप्प्यात
3

India-Canada Uranium Deal: कॅनडा-भारत मेगा युरेनियम डील! तब्बल  २.८ अब्ज डॉलरचा करार अंतिम टप्प्यात

तैवान-व्यापार-युद्ध… तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प-जिनपिंग यांची चर्चा; लवकरच येणार आमने-सामने
4

तैवान-व्यापार-युद्ध… तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प-जिनपिंग यांची चर्चा; लवकरच येणार आमने-सामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.