Japan China Tension: जपानची चीनला धडक! तैवानजवळ घातक क्षेपणास्त्रे तैनात; ट्रम्प यांच्या निर्णयाने आशियात वाढली भीती ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Japan China Tension : पूर्व आशियातील भू-राजकीय समीकरणे क्षणोक्षणी तापत चालली आहेत. तैवानच्या अगदी सीमेवर असलेल्या योनागुनी बेटावर जपानने घातक क्षेपणास्त्र प्रणाली तैनात करण्याची तयारी सुरू केल्यानंतर चीन आणि जपानमधील(Japan China Tension) तणाव धोकादायक वळणावर पोहोचला आहे. जपानचे संरक्षण मंत्री शिंजीरो कोइझुमी यांनी अलीकडेच या बेटावरील लष्करी तळाला भेट देत सांगितले की अशा प्रकारची संरक्षणात्मक तैनाती युद्धाची शक्यता वाढवत नाही, उलट आक्रमणाच्या इराद्यांना रोखण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी ती अत्यावश्यक आहे.
योनागुनी हे बेट तैवानपासून केवळ ११० किलोमीटर अंतरावर आहे आणि जपानच्या संरक्षण धोरणात याचे महत्त्व अत्यंत निर्णायक मानले जाते. यापूर्वीच जपानने इशिगाकी आणि मियाको या बेटांवर जहाजविरोधी क्षेपणास्त्रे व हवाई देखरेख प्रणाली तैनात केल्या आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतरची ही सर्वात गंभीर सुरक्षा परिस्थिती असून, जपान आणि अमेरिका यांना प्रतिबंधक शक्ती वाढवण्यासाठी एकत्र कार्य करणे गरजेचे असल्याचे कोइझुमी यांनी स्पष्ट केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sindh Debate : लवकरच भारत करणार सिंध काबीज? राजनाथ सिंहांच्या ‘अशा’ युद्धप्रेरित धगधगत्या वक्तव्यावर पाकिस्तानचा जळफळाट
या हालचालींमुळे चीनचा रोष अधिक वाढला आहे. काही दिवसांपूर्वी जपानच्या पंतप्रधान साने ताकाची यांनी जाहीर केले होते की, तैवानवर हल्ला झाल्यास जपान आंतरराष्ट्रीय साथीदर राष्ट्रांसोबत लष्करी कारवाई करण्यास मागे हटणार नाही. हे विधान चीनच्या दृष्टिकोनातून थेट आव्हान होते आणि चीनने त्यास तात्काळ “चिथावणीखोर पाऊल” असे संबोधले. त्यानंतर चीनने जपानविरुद्ध आर्थिक दबाव वाढवत व्यापार क्षेत्रात अटी कठोर करणे सुरू केले.
दरम्यान, तैवानवर अमेरिकेचा नवीन आर्थिक आणि सामरिक दबाव वाढताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी तैवानने त्यांच्या जगातील सर्वात प्रगत सेमीकंडक्टर उत्पादनाचा सुमारे ५०% भाग अमेरिकेत हलवावा अशी खुली मागणी केली आहे. तैवानने हे पूर्णतः अव्यवहार्य असल्याचे सांगितले असून, यासाठी दशकभराचा कालावधी, अब्जावधी डॉलर आणि संरचनात्मक बदल आवश्यक असल्याचे मत तैवानी अधिकाऱ्यांनी मांडले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Leak Scandal : ‘मृत्यूचा दलाल…’; CIAच्या माजी प्रमुखांनी पाकिस्तानच्या अनुशाश्त्रज्ञावर केले धडकी भरवणारे आरोप
त्याचवेळी, अमेरिकेने तैवानवर लादलेला २०% आयातकरही चिंतेचा विषय ठरत आहे. हा कर जपान व दक्षिण कोरियावर लादलेल्या करविषयी तिप्पट आहे ज्यामुळे तैवानचा कापड, सायकल निर्मिती आणि मशीन टूल उद्योग थेट धोक्यात आला आहे. या व्यतिरिक्त, ट्रम्प यांनी तैवानला संरक्षण बजेट GDP च्या १०% पर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे; तर तैवान पुढील वर्षी ते फक्त ३% पर्यंत कमी करण्याच्या तयारीत आहे. तैवान, जपान, चीन आणि अमेरिकेमधील हे बदलते समीकरण आता संघर्षमय भविष्याचे संकेत देत आहे. जगातील सर्वात प्रगत सेमिकंडक्टर उद्योग, सामरिक बेटांचे लष्करी महत्त्व आणि महासत्ता संघर्ष या संपूर्ण घटनेला एका मोठ्या सुरक्षा वर्चस्वाच्या लढाईत रूपांतरित करत आहेत.
Ans: तैवानवरील संभाव्य हल्ला आणि चीनच्या वाढत्या प्रभावाला प्रतिबंध करण्यासाठी.
Ans: चीनने जपानला चिथावणीखोर राष्ट्र म्हणून संबोधित केले असून आर्थिक दबाव वाढवला आहे.
Ans: सेमिकंडक्टर उत्पादन स्थलांतर, संरक्षण बजेट वाढ आणि व्यापार शुल्क वाढवण्याचा दबाव.






