Asim Munir is plotting to rejoin Bangladesh with Pakistan
Pakistan News in marathi : इस्लामाबाद : पाकिस्तानचे (Pakistan) लष्करप्रमुख असीम मुनीर (Asim Munir) दक्षिण आशियातमध्ये मोठा डाव खेळत आहे. यासाठी त्यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशीही चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १९७१ मध्ये पाकिस्तानपासून स्वातंत्र्य झालेला बांगलादेश पुन्हा पाकिस्तानमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.
१९७१ मध्ये पाकिस्तानसोबत बांगलादेशाचा (Bangladesh) रक्तरंजित संघर्ष झाला होता. या संघर्षामध्ये भारताने बांगलादेशला साथ दिली होती. यामुळे बांगलादेशला स्वांतत्र्य मिळाले होते. दरम्या प्रसिद्ध पत्रकार सलाहुद्दीन शोएब चौधरी यांनी याबाबत एक धक्कादायक माहिती उघड केली आहे.
चौधरी यांनी दिलेल्या वृत्तानुसार असीम मुनीर, अमेरिकेचे डीप स्टेट, सीआयएचे प्रतिनिधी आणि ढाक्यातील कट्टरपंथी गट एकत्र आले आहे. हे सर्वजण बांगलादेशला पूर्व पाकिस्तान बनवण्याची योजना तयार करत असल्याचे पत्रकार चौधरी यांनी म्हटले आहे. या योजनेत भारतविरोधी दहशतवादी कारवाया, अंमली पदार्थांची तस्करी आणि भारतविरोधी मोहिमांचाही समावेश आहे.
चौधरी यांच्या मते, शेख हसीन यांच्या पतनानंतर मोहम्मद युनूस सरकार स्थापन झाले. तेव्हापासूनच पाकिस्तानची ISI आणि लष्कर बांगलादेशात सक्रिया झाले होते. चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ISI आणि लष्कर बांगलादेशात अस्थिरता निर्माण करत आहे. तसेच राजकीय सत्ता अप्रत्यक्षपणे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
धक्कादायक बाब म्हणजे असीम मुनीर यांनी ही योजना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) समोर मांडली आहे. बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्ये तेलशोधाच्या बदल्यात पाकिस्तानला बांगलदेशला पूर्व पाकिस्तानात बनवण्यासाठी सुट देण्याची मागणी त्यांनी ट्रम्पकडे केली आहे. तसेच बांगलादेशमध्ये सेनाप्रमुखाला हटवण्याचाही प्रयत्न सुरु आहे.
चौधरी यांच्या अहवालानुसार, बांगलादेशात अमंली पदार्थांचे तस्करी केंद्र उभारण्याची योजना असीम मुनीरने आखली आहे. याची माहिती अमेरिकन गुप्तचर संस्थाना देखील असून यासाठी अब्जावधी डॉलर्स निधी तयार केला जाणार आहे. याचा थेट फायदा ISI ला होणार आहे.
तसेच भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्येही आणि म्यानमारमध्येही असीम मुनीर अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्वांचा वापर भारविरोधी केला जाणार आहे. यामुळे भारतावर दडपण येईल आणि चीनही संघर्षात सामील होई अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे दक्षिण आशियामध्ये नवे वादळ उठण्याची शक्यता आहे. असीम मुनीरची योजना यशस्वी झाल्यास बांगलादेशच नव्हे संपूर्ण दक्षिण आशिया धोक्यात येणार आहे.
मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद