Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Nimisha Priya Case Update in marathi : नवी दिल्ली : सध्या भारतीय नर्स निमिषा प्रिया येमेनमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा भोगत आहे. तिच्यावर तिचा बिझनेस पार्टनर आणि पती महदीच्या हत्येचा आरोप आहे. तलाल महदीच्या कुटुंबाने देखील तिच्या फाशीची मागणी केली आहे. यामुळे निमिषाला वाचवण्याचे जवळपास सर्वच दरवाजे बंद झाले आहे. सध्या तिची फाशी तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
याच वेळी सोशल मीडियावर निमिषा प्रियाच्या प्रकरणाबद्दल काही खळबळजनक दावे केले आहे. या दाव्यांचे भारताने खंडन केले आहे. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, भारत सरकार निमिषाला वाचवण्यासाठी नागरिकांनाकडून आर्थिक मदत मागत असल्याचा दावा केला जात आहे. पण भारताच्या परराष्ट्रा मंत्रालयाने यावर सत्य उघड केले आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या तथ्य तपासणी पथकाने (MEA) याचे स्पष्टीकरण दिले आहे. १९ ऑगस्ट रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर MEA ने यासंदर्भात माहिती दिली आहे. MEA ने एक्सवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या मध्ये एक पोस्टरवर ‘स्वेव्ह निोमिषा प्रिया’ लिहिण्यात आले आहे. तसेच यामध्ये बॅंकचे तपशील देण्यात आले आहेत. कॅप्शनमध्ये निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी तुम्ही सरकारला डोनेशन देऊ शकता. यासाठी ८. ३ कोटींची गरज असल्याचे म्हटले आहे.
We have seen claims being made on social media seeking monetary contributions into a GoI designated bank account in the Nimisha Priya case. This is a fake claim.https://t.co/stxeFevl64 pic.twitter.com/4gQGIO4gvP
— MEA FactCheck (@MEAFactCheck) August 19, 2025
MEA ने त्यांच्या फॅक्ट चेक अकाउंटवर याची माहिती दिली आहे. MEA ने म्हटले आहे की, सोशल मीडियावर निमिषाला वाचवण्यासाठी भारत सरकार पैसे गोळा करत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र हा दावा खोटा आहे.
भारत सरकार असे कोणतेही पैसे गोळा करत नाही. भारत सरकार निमिषाला प्रियाला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. परंतु अशा प्रकारे कोणतीही आर्थिक मदत गोळा केली जात नसून सोशल मीडियावरील दाव्यांवर विश्वास ठेवू नका.
येमेनमध्ये निमिषा प्रिया हिने येमेनी व्यापारी तलाल अब्दो महदी याची हत्या केली होती. या प्रकरणी निमिषा गेल्या आठ वर्षांपासून येमेनच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. २०१८ मध्ये तिला महदीच्या खूनाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले होते. नंतर २०२० मध्ये येमेनच्या न्यायालयाने तिला मृत्यूंदडाची शिक्षा सुनावली. सध्या १६ जुलै रोजी निमिषाला दिली जाणारी फाशी तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
सध्या निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या आहेत. तिला वाचवण्यासाठीचे तिच्या कुटुंबीयांच्या आणि भारताच्या प्रयत्नांमध्ये अनेक अडचणी येत आहेत. तलाल महदीचे कुटुंब मृत्यूदंडाच्या मागणीवर अडून राहिले आहे. कुटुंबाने तात्काळ फाशीची मागणी केली आहे.