
pakistan army chief asim munir trolled after afghanistan air strikes war update
General Asim Munir America puppet social media : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील (Afghanistan-Pakistan Conflict) सीमावादाने आता एका विनाशकारी युद्धाचे रूप धारण केले आहे. मात्र, या युद्धाची सर्वात धक्कादायक बाजू म्हणजे, पाकिस्तानच्या लष्करी कारवाईला अफगाणिस्तानपेक्षा स्वतःच्याच देशातील जनतेकडून अधिक तीव्र विरोधाचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात असून, “मुनीर हे अमेरिकेच्या इशाऱ्यावर चालणारे प्यादे आहेत,” अशा शब्दांत पाकिस्तानी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
शुक्रवारी रात्री पाकिस्तानी हवाई दलाने अफगाणिस्तानची राजधानी काबुल आणि ऐतिहासिक शहर कंधारवर भीषण हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये केवळ लष्करी तळच नाही, तर निवासी भागांनाही लक्ष्य करण्यात आले. अफगाण संरक्षण मंत्रालयाच्या दाव्यानुसार, या बॉम्बहल्ल्यात निष्पाप महिला आणि मुलांचा बळी गेला आहे. पाकिस्तान सरकारने या कारवाईचे समर्थन करताना १३३ तालिबानी लढाऊ मारल्याचा दावा केला असला तरी, मृतांच्या आकड्यावरून जागतिक स्तरावर संभ्रम आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pak Afg War: तालिबानचा ‘सुप्रीम लीडर’ संपला? पाकिस्तानच्या ऑपरेशन गझ्ब-लिल-हकने कंधारमध्ये माजवला हाहाकार
हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अफगाण सैन्य (तालिबान) आता आक्रमक झाले आहे. पक्तिका, नांगरहार आणि कुनार प्रांतांमध्ये झालेल्या जमिनीवरील लढाईत अफगाण सैन्याने पाकिस्तानी सैन्याला मागे ढकलले आहे. तालिबानने दावा केला आहे की त्यांनी पाकिस्तानचे दोन लष्करी तळ उद्ध्वस्त केले असून १९ सीमा चौक्यांवर आपले नियंत्रण प्रस्थापित केले आहे. या चकमकींमुळे ड्युरंड रेषेवर आता परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.
Pakistan’s attack on Afghanistan especially during the month of Ramadan is shameful. United States wants to remove the Taliban government from Afghanistan, and that task has been handed to Pakistan, in return for which many benefits can be offered.
These military generals drag us… — Hina Yousafzai (@xhinax) February 27, 2026
credit – social media and Twitter
या संघर्षात पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना सर्वात जास्त टीकेचे धनी व्हावे लागत आहे. सोशल मीडियावर ‘जुहा मलिक’ सारख्या पाकिस्तानी युजर्सनी थेट अफगाण मुजाहिदीनांना आवाहन केले आहे की, “असीम मुनीरशी तुम्हाला हवे तसे वागा, संपूर्ण मुस्लिम जग तुमचे आभारी राहील.” हिना युसूफझाई यांसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या हल्ल्याला ‘लज्जास्पद’ म्हटले आहे. अनेकांचा असा आरोप आहे की, अमेरिका अफगाण सरकार पाडण्यासाठी पाकिस्तानचा बळीचा बकरा म्हणून वापर करत आहे.
Dear Afghan Mujahideen, please deal with Asim Munir as you see fit. Not just Pakistan, the entire Muslim world will thank you for it. — Zuha Malik (@zoemalyks_chai) February 26, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China Military Purge: चीनमध्ये हाहाकार! 100 जनरल आणि कमांडर बेपत्ता; अण्वस्त्र सज्ज चिनी सैन्यात मोठी ‘कत्तल’, नेमकं शिजतंय काय?
अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमीद करझाई यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, “हिंसाचाराने समस्या सुटणार नाहीत,” असा इशारा पाकिस्तानला दिला आहे. तर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी रमजान महिन्याचे पावित्र्य राखण्याचे आवाहन करत दोन्ही देशांना संवादाच्या टेबलावर येण्याची विनंती केली आहे. इराणने या वादात मध्यस्थी करण्याची तयारीही दर्शवली आहे.
Ans: अनेक पाकिस्तानी नागरिकांचा असा विश्वास आहे की, अमेरिका तालिबान सरकारला कमकुवत करण्यासाठी पाकिस्तानचा वापर करत आहे आणि लष्करप्रमुख मुनीर हे अमेरिकन दबावाखाली अफगाणिस्तानवर हल्ले करत आहेत.
Ans: तालिबानने पाकिस्तानचे २ लष्करी तळ आणि १९ सीमा चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा केला असून, सीमेवरील अनेक प्रांतांत पाकिस्तानी सैन्याला मागे ढकलले आहे.
Ans: इराणने या हल्ल्याचा निषेध करून मध्यस्थीची ऑफर दिली आहे, तर माजी अध्यक्ष हमीद करझाई यांनी याला पाकिस्तानचे चुकीचे धोरण म्हटले आहे.