
या अपघातात किमान १६ जणांचा मृत्यू झाला असून १९ जण गंभीर जखमी झाले आहे. एक बस भरधाव वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस सुरक्षा बॅरियरला जाऊन धडकून उलटली. सेमारंगच्या टोल एक्झिटजवळ एका वर्दळीच्या चौकात हा अपघात घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच बचाव अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बसमध्ये अडकेल्या लोकांना बाहेर काढले.
बचाव आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसाचा वेग जास्त होता, ज्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. हा अपघात इतका भयानक होता की प्रत्यक्षदर्शनींचा थरकाप उडाला होता. बस पूर्णपमे हवेत उलटून रस्त्यावर जोरात आदळली होती. बचाव अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक लोक बसमध्ये अडकलेले होते. खिडक्या तुटलेल्या होत्या. लोक गंभीर जखमी झाले होते. तसेच मृतदेहांची देखील वाईट अवस्था होती. हा अपघात घडल्यानंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला होता.
सोमरंगच्या बचाव कार्यलयाचे प्रमुख बुडिओनो यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास तीन-चार तास बचाव कार्य सुरु होते. बसच्या खिडक्यांचा काचा तुटल्यामुळे आणि धातूच्या वाकलेल्या भागांमुळे लोकांना बाहेर काढण्यात अडथळा येत होता. अनेक तासांच्या प्रयत्नांनतर मृतांना आणि जखमींना बाहेर काढण्यात आले.
जखमींना सोमरंग येथील वेगवेगळ्या रुग्णलायांमध्ये दाखल करण्यात आले आहे. यामध्ये अनेकांची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आगे. पोलिस मृत देहांची ओळख पटवण्याचे कार्य करत आहेत. सध्या या अपघाताचे नेमके कारण अस्पष्ट असून त्याचा तपास सरु करण्यात आला आहे.
City Bus Flips in Indonesia, At Least 16 Killed At least 16 people were killed and 18 others injured after a passenger bus struck a barrier and overturned on a toll road in Semarang, Central Java (AP News) pic.twitter.com/JF8MBFAQJq — RT_India (@RT_India_news) December 22, 2025
इंडोनेशियात मान्सूनचा कहर! पूर आणि भूस्खलनामुळे बिकट परिस्थिती, किमान १० जणांचा मृत्यू
Ans: इंडोनेशियात मध्य प्रांतात सेमारंग शहरात भीषण रस्ता अपघात घडला आहे. बसचा वेग जास्त असल्याने एका बॅरियला धडकून उलटली आणि हा अपघात घडला आहे.
Ans: इंडोनेशियातील ताज्या बस अपघातात १६ जणांचा मृत्यू आणि १९ जण जखमी झाले आहेत.