At least 29 students killed in transformer explosion in Central Africa
बांगुई : मध्य आफ्रिकेत एक मोठी दुर्घटना घडली आहे. मध्य आफ्रिकेची राजधानी बांगुईमध्ये एका शाळेत भीषण स्फोट घडला आहे. या दुर्घटनेत २९ विद्यार्थ्यांचा चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झाला आहे, तर २६० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. एका विद्युत ट्रान्सफॉर्मचा मोठा स्फोट झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. यामुळे सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातवारण आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.राष्ट्रीय शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बार्थेलेमी बोंगाड हायस्कूलमध्ये ही घटना घडली. यावेळी बिघडलेला विद्युत ट्रान्सफॉर्मच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. यावेळी हा भीषण स्फोट घडला.
राष्ट्रीय शिक्षण मंत्रालयाने यासंबंधी एक निवेदन जारी केली आहे. या निवेदनात सांगतिले आहे की, बहुतेक लोकांचा मृत्यू स्फोटामुळे नाही तर, भीतीने झालेल्या चेंगराचेंगरीमुळे झाला आहे. यामध्ये १६ मुलींचा समावेश आहे. घटनेच्या वेळी विद्यार्थ्यांची परिक्षा सुरु होती. याच वेळी स्फोटामुळे भीषण आवाज झाला. या आवाजामुळे विद्यार्थी आणि शिक्षण बचावासाठी पळू लागले. यामुळे चेंगराचेंगरी झाली. अनेक मुलांचा यामध्ये बळी गेला. सध्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून अनेकांची प्रकृती गंभीर आहे.
#Breaking
Une #bousculade suite à une explosion de transformateur fait une dizaine de morts cet après-midi au lycée Barthélémy #Boganda de #Bangui en #Centrafrique 🇨🇫. De nombreux blessés ont été transportés vers des hopitaux proches. pic.twitter.com/5loUFDnh5n— KOUAM JOEL HONORE (@honore123) June 25, 2025
तसेच सरकारने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच पीडितांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे आफ्रिकेत शोककळा परसली आहे. या घटनेमुळे देशातील पायाभूत सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेच रहिवाशांकडून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कडक उपाययोजनांची मागणी केली जात आहे. सध्या या घटनेने मध्य आफ्रिकेत मोठी खळबळ उडाली आहे.