At Least 70 killed in boat capsize in west africa
Boat Capsize in West Africa : बुधवारी (२७ ऑगस्ट) पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्यावर एक मोठी दुर्घटना घडली आहे. स्थलांतरितांना घेऊन जाणारी एक बोट समुद्रात उलटली. यामुळे ७० जणांचा मृत्यू झाला आहे. मॉरिटानियाच्या किनाऱ्याजवळ ही घटना घडली. या बोटीत एकूण १५० प्रवासी होते. यातील फक्त १६ जणांना वाचवण्यात यश आले. सध्या बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी बचाव मोहीम सुरु आहे.
स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन सेवांनी घटनास्थळी धाव घेतली. ७० लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर इतर बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे. बचाव पथकाला १६ जणांना वाचवण्यात यश आले आहे. सध्या मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे. या संपूर्ण घटनेने पश्चिम आफ्रिकेत भीतीचे वातावरण पसरले आहे. ही बोट गॅम्बियाहून युरोपला स्थलांतरितांना घेऊन निघाली होती. ही आतापर्यंतची सर्वात भयानक घटना मानली जात आहे.
ब्लड मून ते सूर्यग्रहणापर्यंत…; सप्टेंबर २०२५ खगोलप्रेमींसाठी ठरणार खास, जाणून घ्या काय घडणार?
या अपघातामुळे पुन्हा एकदा पश्चिम आफ्रिकेतून स्पेनच्या कॅनरी बेटांवर पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या धोकादायक मार्गाची भीषणता समोर आली आहे. हा अटलांटिक मार्ग आहे. हा मार्ग अत्यंत धोकादायक मानला जातो. मात्र दरवर्षी हजारो प्रवासी येथून बेकायदेशीररित्या प्रवास करतात.
युरोपियन युनियनने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये या अटलांटिक मार्गावर ४६ हजारो बेकायदेशीर स्थलांतरितांनी प्रवास केला आहे. तर यातील १० हजारोहून अधिक लोकांनी आपला जीव गमवला आहे.
ही धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन गाम्बियाच्या सरकारने नागरिकांना या मार्गावरुन प्रवास टाळण्याचे आवाहन केवे आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावर सातत्याने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे सावधगिरी बाळगा. लोकांना चांगल्या भविष्याच्या शोधात जीव घालतात, पण यामुळे त्यांना मोठी किंमत चुकवावी लागते, असे सरकारने म्हटले आहे.
सध्या या घयटनेने बेकायदेशीर स्थलांरितांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. समुद्री मार्गाने युरोपला पोहोचण्याचा प्रयत्न घातक ठरत आहे. पण देशांमधील राहणीमान आणि संधी सुधारल्यावरच बेकायदेशीर स्थलांतर थांबले असे तज्ञांनी म्हटले आहे.
काय आहे Hotline प्रणाली? ज्यामुळे टळले अमेरिका आणि सोव्हिएतमधील अणु युद्ध