काय आहे Hotline प्रणाली? ज्यामुळे टळले अमेरिका आणि सोव्हिएतमधील अणु युद्ध (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Cold War in America and Soviet Union : १ सप्टेंबर १९३९ मध्ये जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्लायामुळे दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली होती. १९३९ ते १९४५ पर्यंत हे जागतिक युद्ध युरोप व आशियाचे मित्र राष्ट्र (फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका, सोव्हिएत युनियन, चीन) व अक्ष्य (जर्मनी, इटली, जपान) राष्ट्रांमध्ये युद्ध सुरु होते.
दरम्यान या युद्धानंतरही तणावपूर्ण वातावरण होते. यानंतर शीतयुद्धाची सुरुवात झाली होती. अमेरिका आणि सोव्हिएत देश रशिया या दोन महासत्ता देशांमध्ये जगभरात प्रभाव निर्माण करण्यासाठी स्पर्धा सुरु झाली होती. यामध्ये दोन्ही गट लष्करी शक्ती, अंतराळ संशोधन, आर्थिक वर्चस्व या क्षेत्रात एकमेकांना मागे टाकण्याचा प्रयत्न करत होते. १९६० च्या दशकात ही स्पर्धा तिसऱ्या महायुद्धाच्या वळणावर आली होती. यामुळे अणु युद्धाची भीती निर्माण झाली होती.
Vladimir Putin डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर; टॅरिफवॉरदरम्यान रशिया-भारत संबंधासाठी अधिक महत्वपूर्ण
ऑक्टोबर १९६३ मध्ये सोव्हिएत युनियने क्यूबा मिसाइल्स (अणु शस्त्रे) अमेरिकेच्याजवळ तैनात केली होती. यामुळे अमेरिकेला मोठा धोका निर्माण झाला होता. अमेरिकेसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले होते. यावेळी अमेरिकेचे त्यावेळेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ.
केनेडी यांनी लष्कराला तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज होण्यास सांगितले होते. संपूर्ण जगभर मोठी खळबळ उडाली होती. कोणत्याही क्षणी भयंकर अणुयुद्ध सुरु होई अशी परिस्थिती निर्माण झाली होती, १३ दिवस संघर्षाचे वातावरण होते, पण दोन्ही देशांनी हॉटलाइन कम्युनिकेशन सुरु केले आणि तिसऱ्या महायुद्धाचा धोका टळला.
२० जून १९६३ रोजी अमेरिका आणि रशियामध्ये हॉटलाईन संवाद सुरु झाला. त्याकाळात टेलिफोनची सुविधा नव्हती. केवळ तार पाठवनू संदेश पाठवला जात होता. पण हॉटलाइन संवाद सुरु झाल्याने युद्ध टळले. हॉटलाईन प्रणाली ही टेलिटाईप मशीनवर आधारीत ही थेट संवाद प्रणाली होती. यामध्ये अटलांटिक महासागरात काही केबल्स टाकण्यात आल्या. आता या प्रणालीमध्ये आधुनिक सुधारणा करण्यात आली असून उपग्रह तंत्रज्ञानाशी जोडण्यात आली आहे.
या हॉटलाईनवरुन अमेरिकेने सोव्हिएत संघाला वाटाघाटी करण्यासाठी एक मेसेज पाठवला होता. हा मेसेज १२ तास उशीरा पोहोचला होता, यामुळे अधिक गैरसमज वाढत चालला होता. यावेळी अमेरिका आणि सोव्हिएत संघाचे नेते जिनेव्हामध्ये भेटले आणि दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली. यामुळे युद्ध टळले.
यावरुन लक्षात घेण्यासारखे आहे की, संवादाच्या मार्गाने प्रत्येक वादावर तोडगा काढता येतो. यावरुनच रशिया आणि युक्रेनमध्येही सध्या युद्धाचा तोडगा काढण्याचा सल्ला दिला जात आहे. शांततेच्या आणि राजनैतिक मार्गानेच हे युद्ध थांबेल हे नक्की. या हॉटलाइनमुळे अमेरिका आणि सोव्हिएत देश रशियामध्ये संवाद झाला. ज्यामुळे दोन्ही देशांतील युद्ध टळले. तिसऱ्या महायुद्धाचाही धोका टळला.
Israel Yemen War : ‘वाईट कृत्याचे परिणाम…’; इस्रायलच्या हल्ल्यात हुथी बंडखोरांचे पंतप्रधान ठार