ब्लड मून ते सूर्यग्रहणापर्यंत...; सप्टेंबर २०२५ खगोलप्रेमींसाठी ठरणार खास, जाणून घ्या काय घडणार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
खगोल शास्त्रज्ञ आणि अवकाश निरिक्षणाची आवड असणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. यावेळी तुमच्यासाठी २०२५ चा महिना खास ठरणार आहे. कारण या सप्टेंबरमध्ये दोन मोठ्या खगोलीय घटनांचा अनुभव घेता येणार आहे. चंद्रग्रहण आणि सुर्यग्रहण पाहण्याची संधी जगभरातील खगोप्रेमी आणि अवकाश निरीक्षणाची आवड असणाऱ्या लोकांना मिळणार आहे. भारतातही या घटनेचा अनुभव घेता येणार आहे. जाणून घेऊयात या महत्वाच्या घटना
जपानी पंतप्रधानांना भेटताच पंतप्रधान मोदी म्हणाले Arigato Gozaimas; काय आहे याचा अर्थ?
चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्यभागी येते. यावेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. यामुळे चंद्राचा प्रकाश कमी होतो आणि चंद्र लाल गडद रंगाचा दिसतो. साधारणपणे पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण पाहायला मिळते. यावेळी पृथ्वी, सूर्य आणि चंद्र एकाच रेषेत असतात.
खगोलशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यग्रहणाचा अनुभव सप्टेंबर महिन्याच्या शेवटी २१ तारखेला दिसेल. यावेळी आंशिक सूर्यग्रहण असले. हे सूर्यग्रहण प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात दिसेल. हे २०२५ चे शेवटचे सूर्यग्रहण असेल. यापूर्वी २०२५ सालाचे पहिले सूर्यग्रहण २९ मार्चला झाले होते.
काय असते सुर्यग्रहण?
ही एक अशी खगोलीय घटना आहे, ज्यावेळी चंद्र पृथ्वीच्या आणि सूर्याच्या मधे येतो. यावेळी चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. यामुळे पृथ्वीच्या काही भागांत कळोख पडतो. यावेळी पृथ्वी चंद्र आणि सूर्य एका रेषेत येतात. यामुळे सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडत नाही. यामुळे दिवसा काळोख पाहायला मिळतो. साधारणपणे अमवस्येच्या दिवशी सूर्यग्रहण होते.