Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

VIDEO: रेड कार्पेट, आकाशात गरजणारे B-2 बॉम्बर्स आणि फायटर जेट… ट्रम्पने अलास्कामध्ये पुतिनचे केले ‘असे’ स्वागत

Trump Putin Alaska summit : अलास्कामध्ये पुतिन विमानातून उतरताच रेड कार्पेटवर आले तेव्हा ट्रम्प यांनी त्यांचे कौतुक केले. त्यानंतर दोन्ही नेते एकमेकांकडे पाहत हसत राहिले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 16, 2025 | 11:30 AM
At the Alaska Summit Trump welcomed Putin with praise and a smile

At the Alaska Summit Trump welcomed Putin with praise and a smile

Follow Us
Close
Follow Us:

Trump Putin Alaska summit :  जागतिक राजकारणाच्या रंगमंचावर पुन्हा एकदा दोन महासत्ता आमनेसामने आल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी (१५ ऑगस्ट २०२५) अलास्कामध्ये झालेल्या ऐतिहासिक शिखर परिषदेची सुरुवात केली. अँकोरेज येथील जॉइंट बेस एल्मेंडोर्फ-रिचर्डसन येथे हा ऐतिहासिक क्षण साकारला गेला. पुतिन विमानातून उतरताच रेड कार्पेटवर त्यांचे स्वागत करण्यात आले. ट्रम्प स्वतः स्वागतासाठी उपस्थित होते. दोन्ही नेते उबदार हस्तांदोलन करत काही क्षण स्मितहास्य करत राहिले. या स्वागत सोहळ्याने आंतरराष्ट्रीय मंचावर लक्ष वेधले.

यावेळी वरच्या आकाशात अमेरिकेची लष्करी ताकद दाखवणारा देखावा झळकला. शीतयुद्ध काळात डिझाइन केलेले बी-२ स्टेल्थ बॉम्बर्स आणि एफ-२२ रॅप्टर फायटर जेट्स गर्जना करत अलास्काच्या आकाशात फिरले. पुतिन यांनी आकाशाकडे पाहत हलकेसे स्मित केले. मात्र निरीक्षकांच्या मते ही हवाई ताकद दाखवून अमेरिकेने पुतीनला एक संदेश दिला  “अमेरिकन सामर्थ्य विसरू नका.”

pic.twitter.com/3Hwh6vUZ6j — Where is this? (@CsabaSzekely7) August 15, 2025

credit : social media

B-2 Bombers चे सामर्थ्य पुन्हा चर्चेत

अलीकडेच अमेरिकेने इराणच्या अणु तळांवर केलेल्या बॉम्बहल्ल्यामुळे बी-२ बॉम्बरची ताकद पुन्हा चर्चेत आली होती. अमेरिकेतून तब्बल ३६ तास उड्डाण करून हे बॉम्बर थेट इराणमध्ये पोहोचले आणि हल्ल्यानंतर लगेचच अमेरिकेला परतले. अशा क्षमतांनी सज्ज असलेले बॉम्बर पुतिनसमोर उड्डाण करत असल्याने या भेटीचा प्रभाव अधिक ठळक झाला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Putin Meeting: ‘पुढच्या वेळी मॉस्कोमध्ये…’ पुतिन यांचे ट्रम्पला थेट निमंत्रण; युक्रेन युद्धावर गरमागरम चर्चा

शिखर परिषदेतील महत्त्वाचे बदल

व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी सांगितले की, ट्रम्प–पुतिन यांच्यातील आधी नियोजित ‘एक-एक’ बैठक अखेर ‘तीन-तीन’ स्वरूपात झाली. अमेरिकेकडून परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ सहभागी झाले, तर रशियाकडून परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि परराष्ट्र सल्लागार युरी उशाकोव्ह उपस्थित होते.

हा बदल योगायोगाने नाही. २०१८ मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या बैठकीत ट्रम्प–पुतिन यांनी दोन तास फक्त अनुवादकाच्या उपस्थितीत चर्चा केली होती. त्या बैठकीनंतर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर वादंग उसळले होते. त्यामुळे यावेळी व्हाईट हाऊसने अधिक सावधगिरी बाळगत बहुपक्षीय चर्चा करण्यावर भर दिला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump-Putin Meeting : ‘ना युद्धबंदी ना कोणताही करार…’ ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील 3 तासांच्या बैठकीत नेमके काय घडले?

जागतिक समीकरणांसाठी महत्त्वपूर्ण संकेत

या अलास्का भेटीचे परिणाम पुढील काही आठवड्यांत दिसतील. तरीसुद्धा या शिखर परिषदेची सुरुवात ज्या प्रकारे झाली रेड कार्पेट, उबदार स्मित आणि एकाचवेळी अमेरिकेची हवाई ताकद दाखवणे यामुळे हा प्रसंग जागतिक कूटनीतीत दीर्घकाळ लक्षात राहील. अमेरिका आणि रशिया यांच्यातील संबंध तणावपूर्ण असताना दोन्ही नेत्यांचे हसरे चेहरे जागतिक शांततेसाठी आशेचा किरण ठरू शकतात, पण त्यामागे सामर्थ्याचे राजकारणही स्पष्टपणे जाणवले.

Web Title: At the alaska summit trump welcomed putin with praise and a smile

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 11:30 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Russia
  • Vladimir Putin

संबंधित बातम्या

झेलेन्स्कींचा मोठा डाव! फ्रान्ससोबत केला मोठा शस्त्रास्त्र करार, रशियावर दबाव वाढणार?
1

झेलेन्स्कींचा मोठा डाव! फ्रान्ससोबत केला मोठा शस्त्रास्त्र करार, रशियावर दबाव वाढणार?

Trump vs Russia Oil: पुतिनच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्पचे वादग्रस्त विधान! रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा दिला इशारा
2

Trump vs Russia Oil: पुतिनच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्पचे वादग्रस्त विधान! रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा दिला इशारा

Nagpur Export 2025 : अमेरिका ठरली नागपूरची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ! तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात होते परदेशात 
3

Nagpur Export 2025 : अमेरिका ठरली नागपूरची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ! तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात होते परदेशात 

‘रशियासोबत व्यापार केला तर…’ ; डोनाल्ड ट्रम्प यांची जगभरातील देशांना पुन्हा उघड धमकी
4

‘रशियासोबत व्यापार केला तर…’ ; डोनाल्ड ट्रम्प यांची जगभरातील देशांना पुन्हा उघड धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.