attack on Pakistan's Army in Balochista, 20 soldiers killed
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात २० पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या १२ तासांत पाकिस्तानच्या आवारन, क्वेट्टा आणि कलाट जिह्ल्यांमध्ये विद्रोह्यांनी हल्ले केले आहेत. यामध्ये विशेष करुन लष्करी चौक्यांना लक्ष करण्यात आले आहे. परंतु या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही. पंरुत बलुच लिबरेशन आर्मीने हल्ला केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
बुधवारी (१६ जुलै) रोजी बलुचिस्तानच्या कलातमध्ये देखील एका प्रवासी बसवर हल्ला करण्यात आला होता. यामध्ये ३ जणांचा मृत्यू तर १३ जखमी झाले होते. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, क्वेचटा-काराची माहामार्गावर हा हल्ला करण्यात आला होता. विद्रोह्यांनी बस थांबून लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता.
गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानमध्ये अंतर्गत संघर्ष तीव्र झाला आहे. पाकिस्तानी लष्करावर आणि नागरिकांवर हल्ले केले जात आहे. आतापर्यंत एकूण ८५ दहशतवादी हल्ले झाले आहे. यातील सर्वाधिक हल्ले बलुचिस्तान प्रांतात करण्यात आले आहेत. एकट्या बलुचिस्तानात ३५ हल्ले झाले आहेत. यामध्ये ५१ लोक मृत पावले आहेत, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यामध्ये ३० नागरिक १८ सैनिक आणि ३ दहशतवादी ठार झाले आहेत.
यापूर्वी १० जुलै रोजी पाकिस्तानमध्ये एका प्रवासी बसचे अपहरण करण्यात आले होते. यामध्ये ९ प्रवाशांची हत्या करण्यात आली होती. क्वेट्टाहून लाहोरला जाणारी बस बलुच आर्मीने ताब्यात घेतली होती.
गेल्या दीर्घकाळापासून पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात संघर्ष सुरु आहे. बलुचिस्तानमधील बंडखोर गट बलुच लिबरेशन आर्मी सतत पाकिस्तानच्या सुरक्षा कर्मचारी, सरकारी प्रकल्प आणि ६० अब्ज डॉलर्सच्या चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) प्रकल्पांना लक्ष्य करत आहेत. यापूर्वी मार्चमध्ये, ग्वादर बंदराजवळील कलमत भागात लांब शरीराच्या ट्रेलरवर काम करणाऱ्या पाच जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तर फेब्रुवारीमध्ये, बंडखोरांनी पंजाब प्रांतातील सात प्रवाशांना खाली उतरवले आणि बरखान भागात त्यांना जागीच ठार मारले.
बलुच लिबरेशन आर्मीचा पाकिस्तानमधील ही लढाई बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी असल्याचे बीएलएने म्हटले आहे. बीएलएने दावा केला आहे की, त्याच्या प्रांतातील लोकांचे हक्क हिरावून घेतेल जात आहे. यामुळे त्यांच्या स्वातंत्र्यासाठी पाकिस्तानपासून वेगळे होण्याची मागणी बीएलए आर्मी करत आहे.