
Australia Firing
ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवर शार्कचा थरार; ४८ तासांत चार हल्ले, सर्फर जखमी
गोळीबाराची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, न्यू साउथ वेल्सच्या कार्गेलिगो शहरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसाप, मृतांमध्ये दोन मगिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. पुरुषाला गंभीर दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सध्या या गोळीबारामागचे कारण अस्पष्ट आहे. या हल्ल्याचा तपास सुरु करण्यात आला असून हल्लेखोरांनी गोळीबारानंतर तिथून पळ काढला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सध्या हल्लेखोरांचा शोध घेणे आणि त्यांची ओळख पटवण्याचे कार्य सुरु आहे. गोळीबार घडलेल्या परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिसांनी नागरिकांनी घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.
या हल्ल्याच्या एक महिना आधीच १४ डिसेंबर २०२५ रोजी ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथे सामूहिक गोळीबाराची घटना घडली होती. यामध्ये १६ जणांचा मृत्यू, तर ४० लोक जखमी झाले आहे. या हल्ल्यात दोन पाकिस्तानी नागरिकांचा समावेश होता. हल्लेखोरांची ओळख साजिद अक्रम आणि त्याचा मुलगा नवीद अक्रम अशी यांची ओळख पटवण्यात आली होती. या हल्ल्याने ऑस्ट्रेलियाच नव्हे, तर संपूर्ण जग हादरले होते. शिवाय हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचे सांगण्यात आले होते, कारण यहूदींच्या पवित्र सण हनुक्का साजरा करत असताना हा हल्ला झाला होता.
दरम्यान याच वेळी गेल्या चार दिवसापासून न्यू वेल्स येथील किनारपट्टीवर शार्कचे हल्ले वाढले होते. ४८ तासांत तीन हल्ले झाले होते. पहिल्या दोन हल्ल्यांमध्ये दोन अल्पवयीन मुले जखमी झाली होती. यातील एकाच्या पायाचा चावा शार्कने घेतल्याने त्याला पाय गमवावे लागले होते. दुसऱ्याला वेळेत मदत मिळाल्यामुळे थोडक्यात बचावला होता. एका सर्फरवरही हल्ला झाला होता.
ऑस्ट्रेलियात पुन्हा हिंसाचार! मेलबर्नमध्ये ख्रिसमसच्या पहाटे फायरिंग, यहूदींना पुन्हा लक्ष्य?