(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ऑस्ट्रेलियात पुन्हा हिंसाचार! मेलबर्नमध्ये ख्रिसमसच्या पहाटे फायरिंग, यहूदींना पुन्हा लक्ष्य?
न्यू साउथ वेल्सपासून ४६० किलोमीटर अंतरावर असलेल्या पॉइंट प्लोमरजवळ सकाली ९ वाजता एका सर्फवर शार्कने अटॅक केला. सुदैवाने सर्फर या हल्ल्यातून बचावला आहे, मात्र त्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. आणखी एका व्यक्तीवर हल्ला झाला होता. पण सर्फ बोर्डने शार्कवर वार करत व्यक्तीने स्वत:चा बचाव केला आणि तिथून पळ काढला. सध्या सिडनीमधील समु्द्रकिनारे बंद ठेवण्यात आले आहेत.
यापूर्वी रविवारी (१८ जानेवारी २०२६) देखील हल्ला झाला होता. हार्बरमधील शार्क बीचजवळ जंप रॉक नावाच्या कठड्यावरुन एका मुलाने उडी मारली होती. या मुलाचे वय १२ होते. या मुलाने उडी मारताच त्याच्यावर शार्कचा हल्ला केला. पोलिसांनी मुलाला वाचवले आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु शार्कच्या हल्ल्यामुळे चिमुरड्याला त्याचे दोन्ही पाय गमवावे लागले. तर या हल्ल्याच्या एक दिवसानंतर एका ११ वर्षीय मुलावर शार्कचा हल्ला झाला होता. यावेळी चिमुरडा सर्फिग करत होता. परंतु त्याला सुरक्षितपणे वाचवण्यात यश आले. तर आणखी एका २० वर्षीय सर्फरवही हल्ला झाला होता. त्याला पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
सध्या शार्क हल्ल्याच्या या वाढत्या घटना पाहता सरकारने सिडनीतील समुद्रकीनाऱ्यांवर जाण्यास बंदी घातली आहे. लोकांना सर्फिंगवरही बंदी घालण्यात आली आहे. या घटनांमुळे सिडनीतील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने सावधगिरी बाळगण्यासाठी मोठ्या शार्क माशांना पासून बचावासाठी सिडनीच्या किनाऱ्यांवर इलेक्ट्रॉनिक ड्रमलाइन बसवले आहे. अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, गढूळ पाण्यामुळे बुल शार्कच्या हल्ल्यांचा धोका वाढला आहे.






