Australia ordered the Irani ambassador to leave the country
Iran Australia News in marathi : एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाने इराणी राजदूत अहमद सदेघी यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहे. यामागचे कारण म्हणजे ऑस्ट्रेलियाची गुप्तचर संस्था ASIO ला मोठी खळबळजनक माहिती मिळाली आहे. तपासामध्ये आढळून आले आहे की, देशातमध्ये घडलेल्या यहूदीविरोधी घटनांमध्ये इराणचा हात होता. यामुळे ऑस्ट्रेलियाने इराणवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी याची माहिती देताना सांगितले की, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चा या हल्ल्यांमध्ये सहभाग होता. मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये एका ज्यू रेस्टॉरंटला आणि मेलबर्नमधील अदास इस्रायल सिनेगॉगला आग लागली होती. या घटनेमागे IRGC चा कट होता असा आरोप करण्यात आला आहे. पंतप्रधान अल्बानीज यांनी या घटनांचे वर्णन धोकादायक कृत्य म्हणून केले आहे. तसेच इराणमधील आपल्या नागरिकांना देशात परतण्याचे आवाहान ऑस्ट्रेलियाने केले आहे.
भारताला अमेरिकेचा आर्थिक झटका; २५% अतिरिक्त कराची अधिसूचना जारी
याच वेळी ऑस्ट्रेलिया सरकारने देशातील इराणी राजदूत अहमद सदेघींसह आणखी तीन अधिकाऱ्यांना देश सोडण्यास सांगितले आहे. या अधिकाऱ्यांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तसेच देशातील इराणचे वाणिज्य दूतावासही सुरक्षेच्या कारणास्तव बंद केले आहे. पंतप्रधान अल्बानीज यांनी इराणची लष्करी संघटना IRGC दहशतवादी संघटना म्हणून संबोधले आहे. २०१९ मध्ये अमेरिकेनेही या संघटनेला दहशतवादी घोषित केले होते.
अल्बानीज यांनी सांगित केली मध्य पूर्वेतील हत्याकांड थांबवण्याचे आणि तेथील संघर्ष ऑस्ट्रेलियापर्यंत न पोहोचू देण्याचे आवाहन इराणला केले आहे. इराणने यहूदी-विरोधी हल्ल्यामागे IRGC हात असल्याचा दावा ऑस्ट्रेलियाची गुप्तचर संस्थेचे प्रमुख माइक बर्गेस यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, IRGC ने हल्ले करण्यासाठी एका काही लोकांना कामावर ठेवले आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियन नागरिकांचा समावेश आहे. यामुळे सध्या हत्याकांडात सहभागी असलेल्यांचा शोध सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये बोंडी बीचवर एका लुईस कॉन्टिनेंटल रेस्टॉरंटला आग लागली होती. तर दुसऱ्या हल्ला डिसेंबर २०२४ मध्येच ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये अदास इस्रायल सिनेगॉगमधझ्ये झाला होता. यावेळी हल्लेखोरांनी मुखवटा लावला होता. बर्गेस यांनी यामध्ये इराणचा हात असून त्यांची चौकशी देखील करत असल्याचे सांगितले आहे. मात्र अद्याप यासाठी इराण सरकारला जबाबदार धरलेले नाही.