
who is ahmed al ahmed who risked life and snatched terrorist gun
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अहमदने निशस्त्र असताना देखील आपल्या जीवाची पर्वा न करता दहशतवाद्याकडून बंदूक हिसकावून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता की, एका पार्किंग लॉटमध्ये अहमद वाहनांच्या आड लपलेला आहे. यावेळी अहमदने योग्य संधी साधून दहशतवाद्याला मागून पकडले आहे. त्याने त्याच्या हातातून बंदूक हिसकावण्यासाठी जीवाची बाजी मारली आहे. हल्लेखोराची मान पकडत त्याने बंदूक हिसकावून घेतली आहे. यानंतर त्याने हल्लेखोराला खाली पाडले आहे. हे केवळ १५ सेकंदात घडले असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अहमद-अल-अहमद हा ४३ वर्षाचा सामान्य फळ विक्रेता आहे. गोळीबार होत असताना तो तिथून जात होता. त्याला बुंदकांचा कोणताही अनुभव नव्हता. मात्र त्याने आपल्या धाडसाने हल्लेखोराला थांबवल. आपल्या जीवाची पर्वा न करता केवळ १५ सेकंदात त्याने हल्लेखोराला ढेर केले. ज्यामुळे अनेक निरापराध लोकांचा जीव वाचला.
दरम्यान हल्लेखोराकडून बंदुक हिसकावून घेताना अहमदला गोळ्या लागल्या आहेत.त्याला रुग्णलायात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरु आहे. अनेक प्रत्यक्षदर्शींनी त्याना हिरो म्हणत तो लवकर बरा होईल अशी प्रार्थना केली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी देखील अहमदच्या धाडसाचे कौतुक करत त्याला सलाम केला आहे.
After Brown University, massive shooting was seen during the festival of Hanukkah on the Jewish people at Bondi Beach in Sydney Australia Seen here is a brave man single handedly taking down on the shooter Incredible pic.twitter.com/DfoFzVKYjv — Dennis jacob (@12431djm) December 14, 2025
Ans: अहमद-अल-अहमद हा ४३ वर्षाचा सामान्य नागरिक आहे असून त्याचा फळ विकण्याचा व्यवसाय आहे.
Ans: अहमद-अल-अहमदने सिडनीतील बोंडी बीचवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याची बंदूक जिवाची पर्वा न करता हिसकावून घेतली.
Ans: अहमद-अल-अहमदने बोडीं बीचवर गोळीबार झाला यावेळी तो तेथील पार्किंगमध्ये वाहनांच्या मागे लपला. यानंतर संधी मिळताच त्याने हल्लेखोराना मागून मानेला पकडले आणि त्याची बंदूक हिसकावून घेतली. यानंतर त्याने लगेचच हल्लेखोराला खाली पाडले.