सिडनीत मृत्यूचे तांडव! बोंडी बीच हल्ल्यामागे पाकिस्तानी बाप-लेकाचा हात? अमेरिकन गुप्तचर संस्थेचा दावा
न्यू साऊथ वेल्सच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गोळीबार बाप-लेकाने घडवून आणला असून चकामकीत वडीलांचा मृत्यू झाला आहे. तर मुलाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ५० वर्षीय पित्याने आणि त्याच्या २४ वर्षीय मुलाने हा हल्ला घडवून आणला आहे. मुलाला अटक करण्यात आली असून तो जखमी आहे. सध्या त्याच्यावर जवळच्या रुग्णलायात उपचाप सुरु आहे. पोलिसांशी चकामकीदरम्यान त्याला दुखापत झाली.
अमेरिकेच्या (America) गुप्तचर यंत्रणेने देखील याची पुष्ट केली आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, या २४ वर्षीय आरोपीचे नाव नवीद अकमरम असून हा पाकिस्तानी नागिरका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नवीद हा पाकिस्तानी लष्करातील निवृत्त जनरल सादिक अकरम यांचा मुलगा असल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेला मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी दोन्ही बाप-लेक एका दहशतवादी संघटनेशी जोडले गेले होते, अशी माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.
याच वेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळाहून दोन स्फोटेक जप्त करण्यात आली आहे. या स्फोटाकांना सुरक्षितपमे निष्क्रीय करण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी मृत आरोपी सादिक अकरम याच्याकड वैध शस्त्र परवाना असल्याचे आढळले आहे. या परवानावर सादिकने सहा बंदुका खरेदी केल्या होत्या असे पोलिसांनी म्हटले आहे. या सर्व शस्त्रांचा वापर हल्ल्यात करण्यात आला असून सध्या ही शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. आरोपी सादिककडे गेल्या दहा वर्षांपासून शस्त्र परवाना असल्याचे समोर आले आहे.
याच वेळी न्यू साउथ वेल्सचे पोलिस आयुक्त मल लॅन्यन यांनी या हल्ल्यात अन्य कोणताही संशयिताचा सहभाग आढळला नसल्याचे म्हटले आहे. हल्ल्यादरम्यान दोन पोलिस अधिकारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर संपूर्ण ऑस्ट्रिलेयातील धार्मिक स्थळांची सुरक्षितता कडक करण्यात आली आहे.
Ans: ऑस्ट्रेलियाच्या सिडीन परिसरातील बोंडी बीचवर झालेल्या दोन आरोपींचा बाप-लेकाचा समावेश आहे.
Ans: अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात सामील असलेले आरोपी पाकिस्तानी नागरिक आहेत. या २४ वर्षीय नवीद अकरम आणि ५० वर्षीय पाकिस्तानी लष्करातील निवृत्त जनरल सादिक अकरम अशी या आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे,
Ans: यहुदी समुदायाच्या पवित्र सण हनुक्का साजरा केला जात असताना बोंडी बीचवर हल्ला करण्यात आला होता. यामुळे हा हल्ला दहशतवादी हल्ला मानला जात आहे.






