Australian senator Fatima Payman got trolled for Brain Rot speech video
Australia News in Marathi : कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाच्या फेडरल संसदेत पुन्हा एकदा गोंधळ उडाला आहे. पुन्हा एकदा २७ वर्षीय फातिमा यांनी दिलेल्या भाषानंतर त्यांची चर्चा सुरु झाली आहे. यासाठी त्यांना ट्रोल देखील केले जात आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियातून निवडून आलेल्या आणि ऑस्ट्रेलियाच्या फेडरल संसदेत हिजाब घालून प्रवेश करणाऱ्या फातिमा पैमन पहिल्या महिला खासदार म्हणून ओळखल्या जातात. दरम्यान त्यांनी नुकत्याच दिलेल्या भाषणातून ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांच्या सरकारवर टीका केली आहे.
यावेळी त्यांनी Gen Z शैलीचा खास वापर केला आहे. मात्र यामुळे ऑस्ट्रेलियात त्यांना ट्रोल केले जात आहे. खास करुन त्यांच्या ब्रेन रॉट शब्दाच्या वापरावरुन त्यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
फातिमा यांनी पंतप्रधान अँथनी अल्बानीज सरकारवर अपयशी ठरल्याची टिका केली आहे. त्यांनी Gen Z स्लँग्स वापरत सरकावर टीकांचा वार केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, गुफी (Goofy) सरकार खोटं बोलत आहे, Rizzeless, Auraless, आणि Unc पंतप्रधान अशा शब्दात टीका करत सरकार अक्षम्य असल्याचे म्हटले आहे. यामध्ये Caping म्हणजे खोट बोलणारा, तर Choped म्हणजे विस्कळीत अशा शब्दांचाही वापर फातिमा यांनी केला आहे. यातून त्यांनी तरुण पिढीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण यामुळे त्यांना ट्रोलही केले जात आहे.
राजकारणात अशा शब्दांचा वापर करणे अयोग्य असल्याचे काहींनी म्हटले आहे. तर काहींनी त्यांच्या या Gen Z भाषणाचे कौतुक केले आहे. लोकांना याला तरुण पिढीच्या भाषेत बोलणारी खासदार असे म्हटले आहे.
We got Brainrot Speech 2 before GTA 6 🥀 pic.twitter.com/sKjX0kMiYO
— Fatima Payman (@SenatorPayman) September 2, 2025
यापूर्वी देखील २०२४ मध्ये फातिमा पैमन अशाच प्रकारच्या भाषणामुळे ट्रोल झाल्या होत्या. त्यांनी No Cap, Facts यांसारख्या स्लँग्सचा वापर केला होता. यामुळे नव्या पिढीशी संवाद साधता येतो असे त्यांनी म्हटले. परंतु याला लोकांनी राजकीय प्रयोगही म्हटले आहे.
पैमन यांनी २०२२ मध्ये लेबर पक्षातून संसदेत प्रवेश मिळाला होता. परंतु त्यांनी गाझा प्रश्नावरुन लेबर पक्ष सोडला आणि स्वत:चा ऑस्ट्रेलिया व्हाइस पक्ष स्थापन केला. यानंतर त्यांनी अनेक वेळा सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली आहे. अलीकडे त्यांच्या Gen Z शैलीतील भाषणाने लोकांचे अधिक लक्ष वेधले आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.