स्री असणं ठरलं गुन्हा! भूंकपात तालिबान फतव्यामुळे महिलांची ३६ तास दुर्दशा ; पुरुष बचाव कर्मचाऱ्यांनी मदत करण्यास दिला नकार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Afghanistan Earthquake news in Marathi : काबूल : सध्या अफगाणिस्तानमध्ये भूकंपानंतरची परिस्थिती अत्यंत बिकट ठरली आहे. यामुळे अफगाणिस्तानच्या डोंगराळ भागात हजारो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. या भीषण आपत्तीमध्ये २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, तर ३,६०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहे. अनेकजण मलब्याखाली अडकले आहे. मात्र सर्वात जास्त बिकट परिस्थिती महिलांची झाली आहे. कारण तालिबानच्या कडक धार्मिक नियमांमुळे महिलांना वेळेत मिळाली नाही.
तालिबानमध्ये गैर-धार्मिक पुरुषाला तसेच कुटुंब नसलेल्या पुरुषाला तालिबानी महिलांना हात लावण्याची परवानगी नाही. यामुळे पुरुष बचाव कर्मचाऱ्यांना महिलांना वाचवण्यास घाबरत होते. पुरुष बचाव कर्मचाऱ्यांनी महिलांना वाचवण्यास, मलब्याखालून बाहेर काढण्यास नकार दिला होता. यामुळे अनेक महिला तास न तास मलब्याखाली अडकल्या होत्या. यामुळे बचाव कर्मचाऱ्यांमध्ये एक महिवा कर्मतारी नसल्यामुळे महिलांना मदत मिळत नव्हती. यामुळे बचावासाठी तालिबान महिलांना ३६ तास वाट पाहावी लागली.
शेवटी शेजारच्या गावातील महिलांनी मदतीसाठी धाव घेतलीआणि तालिबान महिलांना मलब्यातून बाहरे काढले. अनेक महिलांना उपचारासाठी देखील मदत मिळत नव्हती. पुरुष आणि मुलांवर उपचार होत असताना महिला एका कोपऱ्यात गुन्हेगारासारख्या बसल्या होत्या. एका १९ वर्षाच्या तरुणीने सांगितले की, गावात बचाव पथक आले होते, पण यामध्ये एकही महिला कर्मचारी नव्हती. शिवाय तालिबानच्या निर्णयामुळे पुरुष कर्मचारी त्यांच्यावर उपचार करण्यास कतरत होते. यामुळे सर्व महिला एका कोपऱ्यात बसून राहिल्या.
तालिबानमध्ये महिला स्वातंत्र्यावर बंदी
सध्या अफगाणिस्तानमध्ये भूकंपामुळे अनेक गावे जमीनदोस्त झाली आहे. अफगाणस्तानच्या कुनार आणि नांगरहार प्रांतामध्ये प्रचंड जीवीतहानी झाली आहे. या भागात मदत पोहोचवण्यातही अनेक अडथळे येते आहे. सर्वात जास्त त्रास महिलांना सहन करावा लादले आहे. तालिबानच्या कायद्यांमुळे महिलांना असहाय्य वेदना सहन कराव्या लागत आहेत.