Baba Vanga Prediction Will Japan be swallowed by the sea Fear due to Baba Vanga's prediction; Thousands of tourists cancelled their bookings
जपानच्या रियो तात्सुकी म्हणजे जपानी वेंगा बाबा यांनी केलेल्या आणखी एक भाकीताने खळबळ उडाली आहे. यापूर्वी त्यांनी केलेली भाकीते जवळपास खरी ठरली आहेत. यामुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या त्यांनी जपानबाबत मोठी भाकीत केलं आहे. ५ जुलै रोजी जपानवर मोठे संकट येणार असल्याची भविष्यवाणी त्यांनी केली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भविष्यवाणीचा फटका पर्यटनालाही बसला आहे. लाखो पर्यटकांनी जपानचे बुकिंग रद्द केले आहे.
बाबा वेंगा यांनी त्यांच्या ‘द फ्यूचर एज आय सी इट’ या पुस्तकात त्यांची भाकीत लिहिली आहे. १९९९ मध्ये हे पुस्तक बाजारात आले होते. परंतु त्यावेळी लोकांनी याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र त्यानंतर या पुस्तकातील अनेक भाकिते खरी ठरली. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
१९९९ साली कोरोना व्हायरसची भविष्यवाणी देखील बाबा वेंगा यांनी केली होती. तसेच बाबा वेंगा यांच्या फ्रेडी मर्क्युरी आणि राजकुमारी डायना यांच्या मरणाबाबतही या पुस्तकात सांगतिले होते. याशिवाय बाबा वेंगाचे २०११ च्या कोबे भूकंपाची भविष्यवाणी देखील खरी ठरली होती.
सध्या त्यांनी जपानमध्ये २०२५ मध्ये भूंकपाची आणि त्सुनामीची भविष्यवाणी केली आहे. यामुळे जपानी नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. बाबा वेगां यांनी त्यांच्या पुस्तकात २०२५ जुलैमध्ये जपानच्या दक्षिण महासारगारत मोठा ज्वालामुखीचा उद्रेक, तसेच मोठ्या त्सुनामीची भविष्यवाणी केली आहे.
यामुळे जपानचे दक्षिण द्विप, तैवानचा किनारपट्टा आणि इंडोनेशियाच्या काही भागात हानी होण्याची शक्यता आहे. बाबा वेंगाने दावा केला आहे की, २०११ मधील फुकुशिमा त्सुनामीपेक्षाही यंदा भयावह त्सुनामीचा सामाना लोकांना करावा लागणार आहे. यामध्ये लाखो लोकांचे प्राण जाण्याची भीती आहे.
बाबा वेंगाच्या भाकीतामुळे सध्या मोठी खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. यामुळे जगभरातील अनेक लोकांनी जुलै २०२५ मध्ये जपानला फिरायला जाण्यासाठी केलेले बुकिंग रद्द केले आहे. यामुळे जपानच्या पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५०% टक्क्यांहून अधिक लोकांनी जपाने ते हॉंगकॉंगपर्यंतचे बुकिंग रद्द केले आहे.
यामुळे जपानचे पर्यटन क्षेत्र धोक्यात आले आहे. जपानचे मियागी शहराचे योशिहिरो मुराई यांनी लोकांना बुकिंग रद्द न करण्याची विनंती केली आहे. तसेच लोकांनी घाबरुन न जाण्याचीही विनंती केली आहे. याशिवाय सोशल मीडियावरील कोणत्याही दाव्यांवर तापस वैज्ञानिक तापासाशिवाय विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.