Baba Vanga Predictions: जगावर आणखी एक संकट येणार? बाबा वेगांच्या भविष्यवाणीने पसरली दहशत, काय आहे भाकित? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सध्या २०२० मध्ये चीनमधून पसरलेल्या कोव्हिड-१९ हा विषाणू पुन्हा डोकं वर काढतं आहे. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोव्हायरसच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. अशातच जपानी रियो तात्सुकी म्हणजे जपानी वेंगा बाबा यांनी केलेल्या आणखी एक भाकीताने खळबळ उडाली आहे. यापूर्वी त्यांनी केलेली भाकीते जवळपास खरी ठरली आहेत. यामुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बाबा वेंगा यांनी कोरोना व्हायरसची (COVID-19) महामारीची देखील भाकीत केले होते, ज्याने जगभरात कहर माजवला होता. याच वेळी बाबा वेगां यांचे २०३० साठी केलेले एक भाकीत समोर आले आहे. त्यांनी २०३० मध्ये आणखी एक नवा आणि घातक विषाणू लोकांच्या विनाशाचे कारण ठरेल असे बाबा वेंगा यांनी म्हटले आहे. हजारो लोक मृत्यूमुखी पडण्याची शक्यता आहे.
बाबा वेंगा यांनी त्यांच्या ‘द फ्यूचर एज आय सी इट’ या पुस्तकात त्यांची भाकीत लिहिली आहे. यामध्ये १९९९ साली कोरोना व्हायरस बाबत भाकीत करण्यात आले होते. त्यांनी २०२० मध्ये अज्ञात विषाणू कहर माजवेल असे म्हटले होते, आणि हे खरे ठरले. तसेच त्यांनी २०३०मध्ये आणखी एका धोकादायक विषाणूची शक्यता व्यक्त केली आहे. हा विषाणू करोनाच्या तुलनेत अधिक मृत्यू घडवू शकतो असे बाबा वेंगानी व्यक्त केले आहे.
बाबा वेंगा यांनी केवळ विषाणूच नव्हे तर, २०२५मध्ये जपानमध्ये भयंकर भूंकपाची ही भविष्यवाणी केली आहे. हा भूपंकप प्रचंड विध्वंसक असेल असे त्यांनी म्हटले आहे. तसेच प्रचंड त्सुनामीचा धोकाही त्यांनी जगाला असल्याचे म्हटले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानीची शक्यता आहे. परंतु जपानी अधिकाऱ्यांनी या भविष्यावाणीला खोटे व निराधार म्हटले आहे. जपानने लोकांना कोणत्याही घटनेबद्दल त्याला वैज्ञानिक आधार नसल्यास त्यावर विश्वास ठेवून नये आणि अफवांपासून दूर रहावे असे आवाहन केले आहे.
बाबा वेंगा यांच्या फ्रेडी मर्क्युरी आणि राजकुमारी डायना यांच्या मृत्यूची भविष्यवाणी देखील खरी ठरली आहे. तसेच २०११ च्या कोबे भूकंपचे भाकीतंही खरे ठरले आहे. यामुळे त्यांच्या नवीन भाकिताने अनेकांचे लक्ष वेधले आहे. यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. परंतु याबरोबच विज्ञानाधारित माहिती आणि अधिकृत सुचनांकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे.