VIDEO : फ्रान्समध्ये म्यूझिक फेस्टिव्हलदरम्यान लोकांवर सुईने हल्ला; इंजेक्शनमधून 'हे' खतरनाक ड्रग्ज दिल्याचा संशय (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पॅरिस : फ्रान्समधून एक मोठी बातमी समोर येत आहे. फ्रान्समध्ये एका वार्षिक स्ट्रीट म्युझिक फेस्टिव्हल दरम्यान एक मोठी खळबळजनक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, २१ जून रोजी फेटे दे ला म्युझिक फेस्टिव्हल सुरु होते. यावेळी लोकांवर सुईने हल्ला करण्यात आला. यामुळे घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या इंजेक्शनमधून लोकांना धोकादायक ड्रग्ज दिले गेले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फेटे दे ला म्युझिक फेस्टीव्हलवेळी काही संशयितंनी अचानक लोकांवर सिरिंजचे हल्ले केले. यामध्ये १४५ जण जखमी झाले आहेत. तसेच १२ संशयितांना अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात तोडफोडही करण्यात आली. सध्या या व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, सिरिंजमध्ये रोहिन्पॉल किंवा जीएचबी यांसाखे ड्रग्ज असल्याचा संशय आहे. याचा वापर लोकांना बेशुद्ध करण्यासाठी आणि नशेत आणण्यासाठी केला जातो. सध्या पीडीतांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चाचणी केली जात आहे.
या हल्ल्यांतर्गत लोकांच्या तक्रारीनंतर फ्रान्स पोलिसांनी १२ जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका स्त्रीवादी संघटनने याता इशारा दिला होता. सोशल मीडियावर महिलांना सिरिंजने लक्ष्य केले जात असल्याचे चर्चाही सुरु आहेत. परंतु अद्याप ही चर्चा कुठे आणि कोणी केले आहे हे स्पष्ट झालेले नाही.
😱🤯“Fête de la Terreur”: Syringe Attacks and Riots Shake Paris
Chaos erupted during France’s annual Fête de la Musique celebration:
🚩145 teenage girls were attacked with syringes
🚩Hundreds injured overall — 14 seriously
🚩371 people arrested
🚩51 vehicles set on fireThe… pic.twitter.com/qiHjT6VaLO
— NEXTA (@nexta_tv) June 24, 2025
फ्रान्सच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात १४५ लोकांनी यासंबंधीत तक्रार केली आहे. यामध्ये पॅरिसमधील १३ लोकांचा समावेश आहे. तसेच यामध्ये १५ वर्षीय मुलीचा आणि १८ वर्षीय तरुणाचा देखील समावेश आहे.
यापूर्वी देखील २०२२ मध्ये असाच प्रकार घडला होता. २०२२ मध्ये क्लब,स बार, म्युझिक फेस्टिव्हलदरम्यान सिरिंज हल्ल्यांच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतर लोकांना सतर्क राहण्याचे आणि अशा घटना घडल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. या वर्षी आतापर्यंत ३७० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. सध्या या घटनेने संपूर्ण फ्रान्समध्ये मोठी खळबळ उडाली आहे.