Baloch Army takes control of another city in Pakistan's Balochistan
इस्लामाबाद: एक मोठी माहिती समोर आली आहे. बलुच लिबरेशन आर्मी (BLA)ने पाकिस्तानमधील अनेक शहरांवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. शनिवारी ( ३१ मे) बलुच आर्मीने पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील सुरब शहरावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला होता. शत्रू राष्ट्राच्या सर्व लष्करी, प्रशायसकीय आणि आर्थिक पायाभूत सुविधा नष्ट केल्याचे बीएलएने म्हटले. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. तसेच बलुच आर्मीचा उद्देश आणि ताकदीचा अंदाज घेतला पाकिस्तानवर बलुच आर्मीचा पूर्ण ताबा असेल असे म्हटले जात आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये आता बलुच आर्मीचे राज्य निर्माण होणार असा दावा केला जात आहे.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि फिल्ड मार्शल असीम मुनीर यांच्या क्वेटाला भेटीदरम्यान हा हल्ला झाला. याघटनेची पुष्टी स्वत:हा मुनीर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे केली.
🚨 BREAKING: Baloch Liberation Army (BLA) claims full control of Surab city, seizing key locations including the local bank, Levies station, and police station.
Patrolling & snap checks reported on Quetta-Karachi and Surab-Gidar highways.
— BLA spox Jeeyand Baloch. pic.twitter.com/OyW0IiyYv7— Failed Marshal Asim Munir (@FailedMarshal) May 30, 2025
तसेच बीएलएचे प्रवक्ते झियांद बलोच यांनी सांगितले की, शुक्रवारी तीन तासांहून अधिक काळ बलुच आर्मीची कारवाई सुरु होती. या कारवाई दरम्यान स्वातंत्र्यसैनिकांनी शहरातील महत्वाच्या ठिकाणांना आणि महामार्गांना घेरले.
जियांद बलोच यांनी म्हटले की, बलुच आर्मीने पाकिस्तानी लेव्हीज (निमलष्करी दल) स्टेशन, पोलिस स्टेशन, उपायुक्त कार्यालया, गेस्ट हाऊस आणि एक बॅंक ताब्यात घेतली आहे. तसेच शत्रूच्या पायाभूत सुविधांचे नुकसान केले आहे. या कारवाईदरम्यान सैनिकांनी लेव्ही आणि पोलिस कर्मचाऱ्यांना कैद केले आहे.
तसेच पोलिस स्टेशन आणि उपायुक्त कार्यालयातील सुरक्षा चौक्यांमध्ये ३० कलाश्निकोव्ह, इतर शस्त्रे आणि युद्ध उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. कर्मचाऱ्यांना त्यांच्या बलुच ओळखीच्या आधारावर सशर्त सोडण्यात येईल असे बुलच आर्मीने म्हटले आहे.
बीएलएने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात, स्वातंत्र्य सैनिकांनी शत्रू सैन्याच्या तीन वाहनांना, राज्य गोदामांना, एका अतिथीगृहाला आँणि तीन बॅंकांना आग लावली आहे. तसेच दोन वाहने जप्त करण्यात आली असल्याचे म्हटले आहे.
बीएलएने दिलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे की, उपायुक्त कार्यालयावर ताबा मिळवताना सहाय्यक उपायुक्त हिदायतुल्लाह बुलेदी यांनी बलुच सैनिकांवर हल्ला केला. पण त्यांना कोणतीही इजा न करण्यात पकडून एका खोलीत बंद करण्यात आले. निवदनात त्यांचा जीव गुदलरल्यामुळे मृत्यू झाल्याचे बीएलएने म्हटले आहे.