मध्य पूर्वेत विनाशाचे चिन्ह? इराणने वाढवला युरेनियमचा साठा; संयुक्त राष्ट्रांच्या अणुउर्जा संस्थेचा दावा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
तेहरान: संयुक्त राष्ट्रांच्या अणुउर्जा देखरेखीखालील आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्था (IAEA)ने इराणने युरेनियमचा साठा वाढवला असल्याचा दावा केला आहे. इराण अण्वस्त्रे बनवण्यासाठी हा साठा वाढवत आहे. तसेच इराण अण्वस्त्रे बनवण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA)च्या अहवालानुसार, इराणने युरेनियमचा ६०% शुद्ध साठा वाढवला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA)ने इराणला युरेनियमचा साठा न वाढवण्याचे आणि त्यांच्या अण्वस्त्र बनवण्याच्या धोरणात बदल करण्याचे आवाहन केले आहे. सध्या अमेरिका इराणसोबत अणुकरार चर्चा करण्याच्या प्रयत्नात आहे. याचदरम्यान हा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. अमेरिका आणि इराणमध्ये ओमानच्या मध्यस्थीने चर्चा सुरु आहे, परंतु अद्याप कोणताही ठोस करार झालेला नाही.
याच दरम्यान इस्रायलने IAEAच्या अहवालातून इराण अण्वस्त्रे बनवण्यास पूर्णपणे तयार असल्याचे दिसत आहे, असे म्हटले आहे. इस्रायलने आंतरराष्ट्रीय समुदायाला इराणचे प्रयत्न थांबवण्याचे आवाहन केले आहे.
इस्रायल इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या अध्यक्षतेखाली एक योजना आखण्यात आली आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प नेतन्याहूंना इराणवर हल्ला करण्यापासून रोखत असल्याचे म्हटले जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते, इराणच्या अणु कार्यक्रमावर राजनैतिक मार्गातून तोडगा निघू शकतो, परंतु इस्रायलला अमेरिका आणि इराणमध्ये चांगले संबंध नको आहेत. यामुळे इस्रायल इराणवर हल्ला करण्यासाठी ट्रम्प यांच्या इशाऱ्याची वाट पाहत आहेत.
आंतरराष्ट्रीय अणु एजन्सीच्या अहवालानुसार, १७ मे पर्यंत इराणने युरेनियमच्या साठ्यात ६०% शुद्धतेत वाढ केली आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत हे प्रमाण अधिक असल्याचे अहवालात म्हटले आहे. युरेनियमचे अधिक शुद्धीकरण शस्त्रे बनवण्यासाठी योग्य आहे. या साठ्याची पातळी शस्त्रास्त्र-श्रेणीच्या ९०% शुद्धते एवढी आहे.
इराण अणु शस्त्रे बनवण्याच्या केवळ एक पाऊ मागे असल्याचे अहवालात म्हटले आहे. इराणने सुमारे ४२ किलो युरेनियमचे शुद्धीकरणे केले तर, त्यापासून अणुबॉम्ब बनवता येतील असे संयुक्त राष्ट्रांच्या आयएआएने म्हटले आहे. सध्या इराणकडे एकूण ९२७४.६ किलोग्रॅम युरेनियमचा समृद्ध साठा आहे.
इराणच्या म्हणण्यानुसार, त्यांचा अणु कार्यक्रम अण्वस्त्रे तयार करण्यासाठी नव्हे, तर वीज निर्मितीसाठी तसेच औषध निर्मितीसाठी शांततापूर्ण हेतूने तयार केला जात आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि अणुउर्जा संघटनेने संयुक्त राष्ट्राच्या IEAE चा अहवाल चुकीचा आमि पक्षपाती असल्याचा दावा केला आहे. हा अहवाल राजकीय दबावाखाली तयार करण्यात आला असल्याचे इराणने म्हटले आहे.