Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युनूस सरकारची आणखी एक नवी खेळी; थेट बांगलादेशच्या संविधानात करणार ‘हा’ मोठा बदल

Bangladesh Politics: बांगलादेशमध्ये सध्या मोठे राजकीय बदलांचे वारे वाहत आहेत. शेख हसीना यांच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा आणि देशातून पलायनानंतर अंतरिम सरकारने संविधान बदलण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 16, 2025 | 11:06 AM
युनूस सरकारची आणखी एक नवी खेळी; थेट बांगलादेशच्या संविधानात करणार ‘हा’ मोठा बदल
Follow Us
Close
Follow Us:

ढाका: बांगलादेशमध्ये सध्या मोठे राजकीय बदलांचे वारे वाहत आहेत. शेख हसीना यांच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा आणि देशातून पलायनानंतर अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद यूनुस यांनी बांगलादेशाचे संविधान बदलण्याच्या दृष्टीने पावले उचलली असल्याची बातमी समोर आली आहे. संविधान सुधार आयोगाने त्यांना नुकताच एक रिपोर्ट सादर केला असून यामध्ये धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि राष्ट्रवाद हे राज्याचे तत्त्व बदलण्याचे प्रस्तावित केले आहे.

पाच नवीन तत्त्वांचा समावेश

आयोगाच्या सिफारशीनुसार, बांगलादेशच्या राज्यतत्त्वांमध्ये समानता, मानवीय सन्मान, सामाजिक न्याय, बहुलवाद आणि लोकशाही या पाच तत्त्वांचा समावेश करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयोगाने द्विसदनीय संसद स्थापण्याचा प्रस्ताव दिला आहे. कनिष्ठ सभागृह  ‘नेशनल असेंब्ली’ आणि वरिष्ठ सभागृह ‘सीनेट’ असेल. नवीन प्रस्तावानुसांर फक्त एकच लोकशाही अपरिवर्तित राहिल. याशिवाय, या दोन्ही सदनांचा कार्यकाल सध्याच्या पाच वर्षांऐवजी चार वर्षांचा असावा, अशी शिफारस करण्यात आली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- खळबळजनक! राणी एलिझाबेथ द्वितीयच्या नजरेआड जासूसीचा मोठा कट; ‘या’ देशाचा गुप्तहेर होता जवळचा व्यक्ती

लोकांच्या इच्छेनुसार बदल होणार

आयोगाचे अध्यक्ष अली रियाझ, यांनी यासंबंधित माहिती देताना सांगितल की, बांगलादेशला 1971 च्या मुक्ती युद्धाच्या महान आदर्शांवर काम करायचे आहे. याशिवाय 2024 मधील शेख हसीना विरुद्धच्या चळवळीदरम्यान झालेल्या घटनांमुळए लोकांच्या आकांक्षा लक्षात घेऊन या पाच राज्य तत्त्वांमध्ये बदल करण्यासाठी प्रस्ताव मांडला आहे.

पंतप्रधानांच्या कार्यकाळावरही मर्यादा

प्रस्तावानुसार, कनिष्ठ सभागृह बहुमताच्या प्रतिनिधित्वावर आधारित तर वरिष्ठ सभागृह प्रमाणात्मक प्रतिनिधित्वाच्या आधारे तयार केला जाईल. यामुळे संसदेमध्ये अधिक समतोल आणि विविधता सुनिश्चित केली जाईल, असा आयोगाचा विश्वास आहे. पंतप्रधानांच्या कार्यकाळावरही दोन कार्यकाळांची मर्यादा लावण्याचा प्रस्ताव आयोगाने मांडला आहे. सत्तेचा अधिक्षेप आणि सत्तेचे केंद्रीकरण टाळण्यासाठी पंतप्रधान कार्यालयावर मर्यादा घालणे गरजेचे असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

संस्थात्मक संतुलन राखण्यासाठी परिषद स्थापन होणार

याशिवाय, संस्थात्मक संतुलन राखण्यासाठी ‘राष्ट्रीय संवैधानिक परिषद’ स्थापन करण्याची शिफारस केली आहे. या परिषदेचा समावेश राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश, विरोधी पक्षनेता, दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष आणि इतर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्यात असणार आहे. यामुळे निर्णय प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढेल असे म्हटले जात आहे.

यापूर्वीही संविधानात करण्यात आले होते बदल 

1971 साली तयार झालेल्या बांगलादेशच्या संविधानात आतापर्यंत 17 वेळा बदल करण्यात आले आहेत. मात्र, हा प्रस्तावित बदल बांगलादेशच्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेमध्ये मूलगामी सुधारणा घडवून आणण्याची क्षमता बाळगतो. मोहम्मद यूनुस यांचा हा प्रयत्न देशातील दीर्घकालीन राजकीय अस्थिरतेला नवी दिशा देणारा ठरू शकतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अफगाणिस्तानात पुन्हा एकदा दहशतवादाचे जाळे; अल-कायदा सक्रिय होऊन प्रशिक्षण केंद्रे सुरु

Web Title: Bangladesh commission proposes new priceiples for adding in constitution of bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2025 | 11:06 AM

Topics:  

  • Bangladesh
  • Muhammad Yunus
  • shaikh hasina
  • World news

संबंधित बातम्या

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
1

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
2

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी
3

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Russia Ukraine War: महाभयंकर! रशियाने रेल्वे,बस काहीच सोडले नाही! Air Strike करत थेट…; 30 जखमी
4

Russia Ukraine War: महाभयंकर! रशियाने रेल्वे,बस काहीच सोडले नाही! Air Strike करत थेट…; 30 जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.