Osman Hadi च्या हत्येनंतर बांगलादेशात आंदोलन तीव्र; इंकलाब मंचचा सरकारला मोठा इशारा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Hadi Murder Case : उस्मान हादी हत्या प्रकरणात मोठी कारवाई; स्फोटके अन् शस्त्रांसह आरोपीला अटक
उस्मान हादी बांगलादेशधील प्रसिद्ध विद्यार्थी नेता आणि इंकलाब मंच संघटनेचा प्रमुख प्रवक्त होता. गेल्या वर्षी २०२४ मध्ये पदच्युत पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) विरुद्धच्या आंदोलनात त्याने महत्त्वाची भूमिका निभावली होती. हादी तरुणांमध्ये त्याच्या भाषणामुळे आणि संघटन कौशल्यामुळे अत्यंत लोकप्रिय होता. याशिवाय आगमी निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होता. पण याआधीच त्याची हत्या करण्यात आली. १२ डिसेंबर २०२५ रोजी पल्टन परिसरात ऑटो रिक्षातून हादी प्रवास करत होता. यावेळी त्याच्यावर दोन आरोपींनी मोटारसायकलवर येऊन त्याच्या डोक्यात गोळी झाडली. हादी गंभीर जखमी झाला होता. त्याला ढाकातील मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले. परंतु त्याची प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला सिंगापूरला चांगल्या उपचारांसाठी नेण्यात आले होते. परंतु १८ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण बांगलादेशात खळबळ उडाली होती. यानंतर बांगलादेशात तीव्र हिंसाचार झाला.
सध्या हादीच्या हत्येनंतर बांगलादेशात ढाक्यातील शाहबाग चौक येथे तीव्र निदर्शने सुरु आहेत. शुक्रवार(२६ डिसेंबर) पासून वातावरण तापले असून आंदोलनकर्त्यांनी हादीच्या आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली आहे. शाहबागग चौकाचा भाग आंदोलनकर्त्यांनी अडवून ठेवला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहूत ठप्प झाली होती. अनेक शहरांमध्ये देखील निदर्शकांमुळे रस्ते जाम झाले होते. या आंदोलानामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सरकार चिंतेत आहे.
दरम्यान शाहबागमध्ये सुरु असलेल्या आदोंलनातील निदर्शन कर्त्यांनी थेट सरकारला इशारा दिला आहे. हादी हत्या प्रकरणात तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र होईल असे सांगण्यात आले आहे. गरज पडल्यास मुख्य सल्लागांच्या निवास्थानावर, संसदेवर किंवा कॅन्टोमेंटवर आंदोलन केले जाईल असे म्हटले आहे. या आंदोलना महिला, मुले, आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला आहे. हादीसाठी न्यायाची मागणी तीव्र होत आहे. ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल असे इंकलाब मंचने म्हटले आहे. यामुळे बांगलादेशातील तणाव वाढत आहे.
बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराचे पडसाद परदेशात; लंडनमध्ये दिपू दासच्या हत्येविरोधात तीव्र निदर्शने






