
Bangladesh elections 2026
बांगलादेशात मतदानाच्या पहिल्या दिवशीच BNP आणि जमातच्या कार्यकर्त्यांमध्ये खुलाना येथे जोरदार हाणामारी झाली आहे. याच वेळी मुन्शीगंज-३ आणि गोपालगंज सदर भागात मतदान क्रेंद्रांबाहेर देखील बॉम्ब फेक करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात दौन सैनिक आणि एक १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला गभीर दुखापत झाली असल्याचे सांगितले जात आहे.
बांगलादेशात मतदाननादरम्यान खुलाना येथे BNP आणि जमातच्या कार्यकर्त्यांमध्ये चकामक झाली. दोन्ही गटांमध्ये खुलान्यातील आलिया मदरशामध्ये मतदान झाल्यानंतर मत हेराफेरीवरुन वाद पेटला. या संघर्षात बीएनपीचे माजी कार्यालय सचिव हिफुझमन कोची यांचा मृत्यू झाला. दोन्ही पक्षांमध्ये मदरशामध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीचे रुपांतर नंतर हिंसाचारात झाले. BNP ने दावा केा आहे की, जमातच्या नेत्यांनी मोहिबुझ्झमन कोची यांना ढकलून झाडावर आदळ्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. तर जमातच्या कार्यकर्त्यांनी हा दावा फेटाळत त्यांच्या हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे.
सध्या हिफुझमन कोची यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सध्या परिसरात अस्थिरता कमी केली जात असून घटनेची चौकशी सुरु करण्यात आली आहे. तपासानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले असल्याचे म्हटले आहे.
याच वेळी बांगलादेशच्या निवडणुकीच्या एक दिवस आधी एका २८ वर्षीय हिंदू तरुणाची हत्या करण्यात आली आहे. यामुळे बांगलादेशातील अल्पसंख्याक समुदायामध्ये घबारटीचे वातावरण पसरले आहे. निवडणुकीच्या दिवशीही हिंसाचार सुरु असल्याने बांगलादेशच्या भविष्यातबाबतही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. देशात लोकशाही सरकार स्थापन होणार का अशा चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहेत.
Ans: बांगलादेशात खुलाना येथे BNP आणि जमात-ए-इस्लामीच्या कार्यकर्त्यांमध्ये मदशातील मतदानानंतर मतहेराफेरीवरुन संघर्षा झाला आहे. या संघर्षात एका BNP नेत्याचा मृत्यूही झाला आहे.
Ans: खुलाना येथे झालेल्या BNP आणि जमात-ए-इस्लामीच्या कार्यकर्त्यांच्या संघर्षात BNP चे नेते हिफुझमन कोची यांचा मृत्यू झाला आहे. BNP ने हिफुझमन कोची यांच्या मृत्यूचा आरोप जमातवर केला आहे.
Ans: जमातच्या कार्यकर्त्यांनी हिफुझमन कोची यांच्या हत्येचे आरोप फेटाळत त्यांच्या हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे.