Bangladesh Violence : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी रक्ताचा सडा! हिंदू तरुणाची निघृण हत्या, युनूस सरकारचे दावे फोल? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मीडिया रिपोर्टनुसार, बांगलादेशच्या चम्पारा येथील मौलवी बाजार परिसरात एक २८ वर्षी हिंदू तरुण रतन साहूकारची निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. रतन साहूकार हा चम्पारा भागातील चहाच्या मळ्यात कामगार होता. मात्र बुधवारी (११ फेब्रुवारी) सकाळी चहाच्या मळ्यात अस्थाव्यस्थ अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला. यावेळी त्याच्या मृतहेदाचे हात-पाय दोरीने घट्ट बांधलेले होते. त्याच्या शरीरावर धारदार शस्त्रांनी वार केले होता. सध्या त्याचा मृतदेह ढाका पोलिसांच्या ताब्यात असून ही घटना निवडणुक हिंसाचाराशी जोडली जात आहे. या घटनेचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
सध्या या घटनेमुळे बांगलादेशातील अल्संख्याक हिंदुंमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. बांगलादेशात माजी पंतप्रधान हसीना यांच्या पतनानंतर हिंसाचारात (Bangladesh Violence) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आतापर्यंत अनेकवेळा हिंदूंना लक्ष करण्यात आले असून गेल्या दोन महिन्यांमध्ये ५ हून अधिक हिंदू तरुणांच्या हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी अल्संख्याकांच्या सुरक्षेचे आश्वासन दिले होते. मात्र मतदानाच्या काही तास आधीच हिंदू तरुणाची हत्या झाल्याने त्यांचे आश्वासन पोकळ ठरले आहे.
तज्ज्ञांच्या मते, निवडणुकीच्या वातावरणात मतदानासाठी कट्टरपंथींयाकडून हिंदूंना घाबरवण्यासाठी ही हत्या करण्यात आली आहे. यामुळे बांगलादेश अंतरिम सरकारच्या आश्वासनांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्या मतदान सुरु आहे, मात्र या घटनेने बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षित भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा शोध घेत असून ही हत्या नेमकी मतदारांना धमकवण्यासाठी करण्यात आली की आणखी कोणत्या हेतूने याचा शोध घेतला जात आहे.
Ans: बांगलादेशात निवडणुकीच्या एक दिवस आधी बुधवारी एका हिंदू तरुणाची निघृणपणे हत्या झाली आहे.
Ans: बांगलादेशच्या चम्पारा येथील मौलवी बाजार परिसरात एक २८ वर्षी हिंदू तरुण रतन साहूकारची ११ फेब्रुवारी २०२६ रोजी निवडणुकीच्या एकदिवस आधी निघृणपणे हत्या करण्यात आली आहे.
Ans: बांगलादेशात निवडणुकीच्या एक दिवस आधी झालेल्या हिंदू तरुणाच्या हत्येने अल्पसंख्याक हिंदू समुदायात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदुंच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.






