Bangladesh Elections : 'ही निवडणूक एक Joke'... युनूसवर शेख हसीनाच्या पक्षाचे टीकास्त्र; बांगलादेश निवडणूक रद्द होणार? (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
अवामी लीग पक्षाने सोशल मीडियावर पोस्ट करत, आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीची मागणी केली आहे. पक्षाने आयोजित निवडणुका बनावट असल्याचे आणि अवामी लीग सरकारला बाहेर काढण्यासाठी असल्याची टीका केली आहे. ही निवडणुक कट्टरपंथी विचारसरणीला पाठिंबा देत असल्याचा दावा अवामी लीगने केला आहे. अवामी लीगच्या मते, मतदारांना जीव मारण्याची धमकी देऊन त्यांचे मत घेतले जात आहे.
सरकारकडून छळाचा वापर केला जात आहे, दंगली आणि हिंसाचार घडवून आणला जत आहे. लोकांच्या इच्छेविरोधात त्यांना मतदान करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.अवामी लीगच्या आरोपांनुसार, मतदांरांची संख्या वाढविण्याचे षड्यंत्र रचण्यात आले आहे. तसेच निवडणुकीच्या वातावरणात जमावाकडून हिंसाचार, लिंचिंग आणि छळ सुरु आहे. अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना विनाकारण तुरुंगात टाकले जात आहे. लोकशाहीला समर्थन करणाऱ्या पत्रकार, कार्यकर्त्यां, प्रचारकांनाही खोट्या आरोपांखील तुरुंगात ठेवण्यात आले आहे.पक्षाने निवडणुकीचे हास्यास्पद वर्णने केले लोकशाहीचा विनाश होत असल्याचे म्हटले आहे.
तसेच युनूस सरकारवर टीका करताना अवामी लीगने म्हटले आहे की, जनमत चाचणीच्या नावाखाली सरकारी निधीचा युनूस सरकारने गैरवापर केला आहे. निकाल पूर्वनिर्धारित असल्याचे अवामी लीगचे म्हणमे आहे. यामुळे अवामी लीगने आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांना निवडणुकीतील त्रुटी उघड करण्याचे आवाहन केले आहे.
An Appeal to the International Community to Save Bangladesh from Collapse
—
This staged exercise is not only about excluding Awami League. Rather this sham polls excludes several political parities that opposed to radical ideology and stands for a liberal country. Merely for… pic.twitter.com/s5jbn4TN5f — Bangladesh Awami League (@albd1971) February 12, 2026
Ans: अवामी लीग पक्षाने युनूस सरकारवर निवडणुका बनावट असून निकाल पूर्वनिर्धारित असल्याचा आरोप केला आहे. तसेच मतदारांना धमकावून मतदानासाठी भाग पाडले जात आहे. यासाठी सरकारकडून दंगली, हिंसाचार व छळाचा वापर केला जात आहे.
Ans: अवामी लीगने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे निवडणुकीतील त्रुटी उघडण्याचे आवाहन केले आहे. देशात लोकशाही धोका निर्माण झाला असून देशाला वाचावण्याचे आवाहन केले आहे.






