Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rooppur NPP: भारताच्या शेजारील देशात अणुक्रांती; रशियाच्या मदतीने ‘हा’ देश आता बनवणार स्वतःची वीज, काय आहे भारत कनेक्शन?

Bangladesh Nuclear Power Plant : मंगळवारी (दि. 28 एप्रिल 2026) बांगलादेशने अणुऊर्जा निर्मितीच्या युगात प्रवेश केला. रूपपूर अणुऊर्जा प्रकल्पातील व्हीव्हीईआर-१२०० (VVER-1200) अणुभट्टीमध्ये इंधन भरण्यास सुरुवात झाली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 29, 2026 | 02:30 PM
bangladesh first nuclear power plant rooppur russia technology vver 1200 impact on india 2026

bangladesh first nuclear power plant rooppur russia technology vver 1200 impact on india 2026

Follow Us
Follow Us:
  • बांगलादेशची अणुझेप
  • रशियाचा मोठा वाटा
  • भारतावर काय परिणाम होणार?

Bangladesh Rooppur Nuclear Power Plant : भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशने मंगळवारी इतिहासातील सर्वात मोठी झेप घेतली आहे. गेली अनेक वर्षे ज्या प्रकल्पाची प्रतीक्षा होती, त्या ‘रूपपूर अणुऊर्जा प्रकल्पा’मध्ये (Rooppur Nuclear Power Plant) आता प्रत्यक्षात इंधन भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासोबतच बांगलादेशने अधिकृतपणे अणुऊर्जा निर्मितीच्या जागतिक युगात प्रवेश केला आहे. राजधानी ढाकापासून १६० किमी अंतरावर असलेल्या पाबना जिल्ह्यात उभारलेला हा प्रकल्प केवळ बांगलादेशसाठीच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण आशियासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

रशियाचे अत्याधुनिक ‘Gen III+’ तंत्रज्ञान

रूपपूर प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वापरण्यात आलेली रशियन बनावटीची VVER-1200 अणुभट्टी. हे रशियाचे ‘जेन III+’ (Generation III+) श्रेणीतील प्रगत दाबयुक्त जल अणुभट्टी (Pressurized Water Reactor) तंत्रज्ञान आहे. विशेष म्हणजे, भारतदेखील तामिळनाडूतील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या नवीन युनिट्ससाठी याच तंत्रज्ञानाचा विचार करत आहे. या तंत्रज्ञानामुळे विजेची निर्मिती अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम पद्धतीने होते. २.४ गिगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प बांगलादेशच्या एकूण विजेच्या गरजेपैकी १० ते १२ टक्के पुरवठा एकट्याने करणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ganga Expressway: गुगल मॅप्सवर का दिसेना गंगा एक्सप्रेसवे? पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन; 36,000 कोटींचा प्रकल्प तयार पण…

ऊर्जा सुरक्षेचा नवा अध्याय

बांगलादेशचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फकीर महबूब अनाम यांनी या ऐतिहासिक क्षणी आनंद व्यक्त केला. त्यांच्या मते, रूपपूर प्रकल्प केवळ वीज देणार नाही, तर तो बांगलादेशच्या औद्योगिक विकासाला गती देईल. १३ अब्ज डॉलर्स (सुमारे १ लाख कोटी रुपयांहून अधिक) खर्चाचा हा प्रकल्प रशियाच्या ‘रोसाटॉम’ या सरकारी कंपनीने उभारला आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण खर्चापैकी ९० टक्के रक्कम रशियाने सरकारी कर्ज म्हणून दिली आहे. २०२६ च्या अखेरीस यातील पहिले युनिट पूर्णपणे बांगलादेशच्या ताब्यात दिले जाईल आणि २०२७ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने धावू लागेल.

⚡️@Rosatom: 🇷🇺🇧🇩 On April 28, Rosatom launched Bangladesh’s first nuclear power plant – the #Rooppur NPP. We are pleased to be working together with our Bangladeshi friends to create a modern & reliable NPP – a key element of the country’s energy systemhttps://t.co/klw0sNr9pu pic.twitter.com/rISS0E4fD1 — MFA Russia 🇷🇺 (@mfa_russia) April 28, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : DIVEX 2026: समुद्रात भारताचे ‘ऑपरेशन समुद्रमंथन’! चीनच्या नाकेबंदीसाठी श्रीलंका आणि भारतीय नौदल सज्ज; खोल समुद्रात दाखवला पराक्रम

भारतासोबतच्या संबंधांवर परिणाम

सध्या बांगलादेश आपल्या विजेच्या गरजेसाठी मोठ्या प्रमाणावर भारतावर अवलंबून आहे. भारताकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात वीज बांगलादेशला निर्यात केली जाते. मात्र, रूपपूर प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर बांगलादेशची ही गरज कमी होऊ शकते. साहजिकच, यामुळे भारताकडून होणारी वीज खरेदी किंचित कमी होईल, पण पूर्णपणे थांबणार नाही. दुसरीकडे, कुडनकुलममध्ये भारत आणि रशिया ज्याप्रमाणे एकत्र काम करत आहेत, त्याच धर्तीवर बांगलादेशमध्ये रशियाने हे यश मिळवणे, हे दक्षिण आशियात रशियाचा वाढता प्रभाव दर्शवते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बांगलादेशच्या पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाचे नाव काय आहे?

    Ans: बांगलादेशच्या पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाचे नाव 'रूपपूर अणुऊर्जा प्रकल्प' (Rooppur NPP) असून तो पाबना जिल्ह्यात स्थित आहे.

  • Que: हा प्रकल्प कोणत्या देशाच्या मदतीने उभारला जात आहे?

    Ans: हा प्रकल्प रशियाच्या 'रोसाटॉम' (Rosatom) या सरकारी अणुऊर्जा महामंडळाच्या मदतीने आणि रशियन कर्जावर उभारला जात आहे.

  • Que: रूपपूर प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता किती आहे?

    Ans: या प्रकल्पाची एकूण क्षमता २.४ गिगावॅट (२४०० मेगावॅट) आहे, जी बांगलादेशच्या विजेच्या गरजेपैकी १०-१२% भाग भागवेल.

Web Title: Bangladesh first nuclear power plant rooppur russia technology vver 1200 impact on india 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Bangladesh News
  • Russia

संबंधित बातम्या

Moscow Blast News: मॉस्कोमधील इटालियन रेस्टॉरंटबाहेर हस्तनिर्मित बॉम्बचा भीषण स्फोट; रशियन तपास यंत्रणा सतर्क
1

Moscow Blast News: मॉस्कोमधील इटालियन रेस्टॉरंटबाहेर हस्तनिर्मित बॉम्बचा भीषण स्फोट; रशियन तपास यंत्रणा सतर्क

Pakistan Row : दक्षिण आशियात नवा राजनैतिक वाद; ‘काफिर’ वादावर बांगलादेशने पाकिस्तानला सुनावले खडे बोल
2

Pakistan Row : दक्षिण आशियात नवा राजनैतिक वाद; ‘काफिर’ वादावर बांगलादेशने पाकिस्तानला सुनावले खडे बोल

Bangladesh Heat Crisis : उष्णतेची मोठी किंमत! बांग्लादेशातील गारमेंट कामगार उकाड्यात होरपळले; बेशुद्धी, उत्पादनावरही परिणाम
3

Bangladesh Heat Crisis : उष्णतेची मोठी किंमत! बांग्लादेशातील गारमेंट कामगार उकाड्यात होरपळले; बेशुद्धी, उत्पादनावरही परिणाम

Red Sea Crisis: इराणला मोठा धक्का! हुथींविरुद्ध सौदीच्या नव्या सैनिकी आघाडीत आशियातील ‘हे’ दोन मुस्लिम देश सामील
4

Red Sea Crisis: इराणला मोठा धक्का! हुथींविरुद्ध सौदीच्या नव्या सैनिकी आघाडीत आशियातील ‘हे’ दोन मुस्लिम देश सामील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.