Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Protect Bangladesh Hindus : बांगलादेशात हिंदू पुजाऱ्याचा ‘बळी’? झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ

Bangladesh News: बांगलादेशातील कॉक्स बाजार येथे हिंदू पुजारी नयन दास यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या पुजाऱ्याच्या मृत्यूमुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 23, 2026 | 10:51 AM
bangladesh hindu priest nayan das dead body found in coxs bazar hills 2026

bangladesh hindu priest nayan das dead body found in coxs bazar hills 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • पुजाऱ्याची निर्घृण हत्या
  • रहस्यमय बेपत्ता प्रकरण
  • अल्पसंख्याकांमध्ये भीती

Cox’s Bazar Hindu priest death 2026 : बांगलादेशातील हिंदू (Bangladesh) अल्पसंख्याकांवरील संकटाचे ढग गडद होताना दिसत आहेत. कॉक्स बाजार (Cox’s Bazar) सारख्या जगप्रसिद्ध पर्यटन क्षेत्राच्या जवळ असलेल्या डोंगराळ भागात एका हिंदू पुजाऱ्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडल्याने संपूर्ण देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. स्थानिक नागपंचमी मंदिरात सेवा देणारे पुजारी नयन दास यांच्या या मृत्यूमुळे बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

एका अज्ञात फोनने आयुष्य संपवले?

मिळालेल्या माहितीनुसार, १९ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नयन दास यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. “काही कामासाठी बाहेर येतो,” असे सांगून ते घरातून निघाले, मात्र ते पुन्हा परतलेच नाहीत. २० एप्रिल रोजी त्यांच्या कुटुंबीयांनी कॉक्स बाजार सदर मॉडेल पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तीन दिवस स्थानिक नागरिक आणि मंदिराचे सहकारी त्यांचा शोध घेत होते. मात्र, बुधवारी दुपारी खुरुशखुल युनियनच्या दुर्गम डोंगराळ भागात एका झाडाला त्यांचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळला. गळ्याभोवती स्कार्फ गुंडाळलेला असल्याने ही घटना अत्यंत संशयास्पद मानली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran-US War: समुद्रात महासत्तेचा वेढा! 17 युद्धनौका, 10,000 सैनिक लढाऊ विमानांनी होर्मुझला विळखा; वाचा नेमकं काय घडतंय?

तपासाचे चक्र आणि स्थानिकांचा आक्रोश

पोलीस अधिकारी मोहम्मद समीउद्दीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात ही आत्महत्या वाटू शकते, असा पोलिसांचा अंदाज असला तरी, स्थानिकांनी आणि हिंदू संघटनांनी हा नियोजित हत्येचा कट असल्याचे म्हटले आहे. कॉक्स बाजार पूजा उदयपन परिषदेचे सरचिटणीस जॉनी धर यांनी या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. दुर्गम भागात मृतदेह सापडणे आणि त्यापूर्वी त्यांना आलेला अज्ञात फोन, या बाबींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असा सूर उमटत आहे.

A SILENT GENOCIDE COMPOUNDED BY THE COMPLICITY OF SILENCE. Bangladeshi Hindus continue to be persecuted. A temple caretaker in Cox Bazar was taken away by two men on April 19. His body has been found hanging from a tree today. The victim is 40 year old Nayan Das. pic.twitter.com/xuQ18dVtFn — Rahul Shivshankar (@RShivshankar) April 23, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Tariffs: ट्रम्प सरकार व्याजासहित 15 लाख कोटी रुपये करणार परत; भारताच्या वाट्याला 12 अब्ज डॉलर्स, वाचा पण केव्हा अन् कसे?

सरकारच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह

बांगलादेशात अलीकडेच झालेल्या राजकीय बदलानंतर आणि तारिक रहमान यांच्या विजयानंतर हिंदू समुदायाला सुरक्षेचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात हिंदू मंदिरे आणि पुजाऱ्यांना लक्ष्य करण्याच्या घटना थांबताना दिसत नाहीत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी या घटनेचा निषेध केला असून, बांगलादेश सरकारने अद्याप कोणतीही कठोर पावले उचलली नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हिंदू समुदायामध्ये आता स्वतःच्या घरातच राहण्याची भीती निर्माण झाली असून, न्याय मिळण्यासाठी जगभरातील हिंदू संघटनांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बांगलादेशात कोणत्या हिंदू पुजाऱ्याचा मृतदेह सापडला?

    Ans: कॉक्स बाजार येथील स्थानिक नागपंचमी मंदिराचे पुजारी नयन दास यांचा मृतदेह डोंगराळ भागात झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला.

  • Que: नयन दास कधीपासून बेपत्ता होते?

    Ans: नयन दास १९ एप्रिल रोजी रात्री एका अज्ञात फोननंतर घराबाहेर पडले होते आणि तेव्हापासून बेपत्ता होते.

  • Que: बांगलादेशातील हिंदू समुदायाची मागणी काय आहे?

    Ans: हिंदू समुदायाने या घटनेची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करून पुजाऱ्याच्या मृत्यूचे गूढ उकलण्याची आणि गुन्हेगारांना फाशी देण्याची मागणी केली आहे.

Web Title: Bangladesh hindu priest nayan das dead body found in coxs bazar hills 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 10:51 AM

Topics:  

  • Bangladesh
  • Hindu
  • World news

संबंधित बातम्या

Cyber Warfare : इराणचा डिजिटल स्ट्राईक! भारताचा जगाची संपर्क तुटणार? ‘त्या’ एका नकाशाने उडवली झोप
1

Cyber Warfare : इराणचा डिजिटल स्ट्राईक! भारताचा जगाची संपर्क तुटणार? ‘त्या’ एका नकाशाने उडवली झोप

Drone Warfare : जगाचा विनाश अटळ? चीनने लॉंच केलं ‘मधमाशासारखं’ डसणारं घातक शस्त्र, भारतासाठी धोक्याची घंटा? 
2

Drone Warfare : जगाचा विनाश अटळ? चीनने लॉंच केलं ‘मधमाशासारखं’ डसणारं घातक शस्त्र, भारतासाठी धोक्याची घंटा? 

Press Freedom : कर्तव्य बजावताना मृत्यूला कवटाळलं! पत्रकार अमल खलील इस्रायली हल्ल्यात ठार; लेबनॉन पेटून उठलं
3

Press Freedom : कर्तव्य बजावताना मृत्यूला कवटाळलं! पत्रकार अमल खलील इस्रायली हल्ल्यात ठार; लेबनॉन पेटून उठलं

US Iran Peace Talks : युद्ध थांबणार? इस्लामाबादमध्ये पुन्हा रंगणार अमेरिका-इराण शांतता चर्चा, ट्रम्प ७२ तासांत घेणार मोठा निर्णय
4

US Iran Peace Talks : युद्ध थांबणार? इस्लामाबादमध्ये पुन्हा रंगणार अमेरिका-इराण शांतता चर्चा, ट्रम्प ७२ तासांत घेणार मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.