Bangladesh Hindu Violence's Hindu Community Leader Abducted, Killed In Bangladesh
ढाका: बांगलादेशात पुन्हा एकदा हिंदु समुदायवर हल्ला झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बांगलादेश पूजा उद्यापन परिषदेच्या बिरल युनिटचे भावेश चंद्र रॉय यांची हत्या करण्यात आली. 58 वर्षीय भावेश रॉय यांचे गुरुवारी अपहरण करण्यात आले आणि नंतर घरात घुसून अपहरण करण्यात आले आणि नंतर त्यांची मारहाण करुन हत्या करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे बांगलादेशमधील हिंदू समुदायात पुन्हा एकदा संताप उसळला आहे.
भावेश रॉय हे ढाक्यापासून सुमारे 330 किमी अंतरावर असलेल्या दिनाजपूर जिल्ह्यातील बसुदेवपूरचे रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, गुरवारी दुपारच्या सुमारास त्यांना एक फोन आला, यावेळी त्यांना केवळ घरी आहात का विचारण्यात आले. त्यानंतर ताही वेळात चार अज्ञात बाईस्वार त्यांच्या घरात घुसले. त्यांनी रॉय यांचे अपहरण करुन घेऊन गेले. प्रत्यक्षदर्शणींच्या म्हणण्यानुसार, त्यांना नाराबारी गावात नेऊन तिथे त्यांची निघृण हत्या करण्यात आली. नंतर त्यांना बेशुद्ध अवस्थेत व्हॅनमधून हल्लेखोरांनी घरी पाठवले. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अद्याप भावेश रॉय यांच्या हत्येच्या गुन्ह्याची नोंद केलेली नाही. बिराल पोलीस स्टेशनच्ये प्रभारी अधिकारी अब्दुस सबूर यांनी म्हटले की, सध्या गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. ओरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. भावेश रॉय यांच्या पत्नीने दोन आरोपींनी ओळखले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
सध्या या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला असून भारताने बांगलादेश सरकारवर टीका केली आहे. भारताने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. भारताच्या परराष्ट्र मं६ालयाने बांगलादेशना सुनावले आहे की, भारताला नैतिक उपदेश देण्याऐवजी त्यांनी आपल्या देशातील हिंदू व इतर अल्पसंख्यांकीय लोकांच्या संरक्षणावर लक्ष द्यावे. हिंदूवरील अत्यांचारांना आळा घालण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
शेख हसीना यांच्या सरकारच्या सत्तापलटानंतर बांगलादेशात कायदा व सुवस्था ढासळली आहे. बांगलादेशत हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन अल्पसंख्यांवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, ऑगस्ट ते डिसेंबक 2024 दरम्यान 32 हिंदूची हत्या, 13 महिलांवर अत्याचार आणि 133 मंदिरे उद्धवस्त करण्यात आली आहेत. बांगलादेश सरकारने हिंसाचारात आतापर्यंत 70 जणांना अटक केली असून 88 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या बांगलादेशातील परिस्थिती अल्पसंख्याकांसाठी चिंताजनक बनली आहे.