Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हिंदूंवरील अन्याय थांबायला हवा’…; ‘या’ भारतीय व्यक्तीने बांगलादेश सरकारला लिहिलं पत्र

Bangladesh Hindu Violence: शेख हसीना यांच्या देश सोडून गेल्यानंतर सत्तापालट झाली आणि मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आले. अंतरिम सरकार सत्तेत आल्यानंतरही हिंदूंवरील हल्ले सुरूच आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 04, 2024 | 12:09 PM
'अन्याय थांबायला हवा'...; बांगलादेश सरकारला हिंदूंवरील अत्याचाराविरोधात कोणी लिहिलं पत्र?

'अन्याय थांबायला हवा'...; बांगलादेश सरकारला हिंदूंवरील अत्याचाराविरोधात कोणी लिहिलं पत्र?

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली: बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचार सुरूच आहे. शेख हसीना यांच्या देश सोडून गेल्यानंतर सत्तापालट झाली आणि मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आले. अंतरिम सरकार सत्तेत आल्यानंतरही हिंदूंवरील हल्ले सुरूच आहेत. यामुळे हिंदूच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान दिल्लीतील जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी बांगलादेशाल पत्र लिहिले आहे. त्यांनी हिंदूवरील होणारे अन्याय आणि हल्ले थांबण्याची मागणी या पत्रात केली आहे.

देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा जपावी

इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी या पत्रात म्हटले आहे की, बांदलादेशाचा एक विश्वासू शेजारी, जवळचा मित्र आणि आपल्या सामायिक सांस्कृतिक वारशाचा संरक्षक म्हणून हे पत्र मी तुम्हाला लिहित आहे. मी बांगलादेशाच्या सरकारला तसेच नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांना विनंती करतो की, हिंदू अल्पसंख्यांकावरील कोणत्याही प्रकारचा अन्याय करु नये. यावर त्वरित पावले उचलली जावीत. यामुळे देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा निर्दोष राहील, असे त्यांनी म्हटले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Bangladesh Violence: ‘बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचारामागे मास्टरमाईंड’; शेख हसीना यांचा मोहम्मद युनूसवर गंभीर आरोप

भारत-बांगलादेशाचे घनिष्ट संबंध

याशिवाय बुखारी यांनी आपल्या पत्रात हेही म्हटले आहे की, बांगलादेशाच्या स्थापनेपासून भारत-बांगलादेशाचे घनिष्ट संबंध आहेत.भारताने आमचे राष्ट्रीय नेतृत्व, मीडिया, नागरी समाज आणि प्रभावशाली लोकांनी शेख मुजीबुर रहमान, त्यांची मुलगी शेख हसीना वाजिद आणि त्यांचा पक्ष अवामी लीग यांच्याशी घनिष्ठ संबंध ठेवले आहेत. तसेच बांगलादेश नेहमीच भारताच्या पाठीशी आंतरराष्ट्रीय समस्या आणि मुस्लिम जगाशी संबंधित बाबींमध्ये  उभा राहिला आहे.

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

संयुक्त राष्ट्रांचा उल्लेख

तसेच त्यांनी संयुक्त राष्ट्रांचा उल्लेख करत म्हटले की, अल्पसंख्याकांच्या समान हक्कांच्या संरक्षणाबाबत संयुक्त राष्ट्रांने घोषणा केली आहे. याचे पालन करणे आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सर्व सदस्यांना आणि संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य राष्ट्रांना बंधनकारक आहे. यामुळे हिंदूंवरील अन्याय, हल्ले आणि एकतर्फी कारवाई निंदनीय असून हे त्वरित थांबवण्यात यावे. तसेच अशा कृतींचे आम्ही समर्थन करत नाही असेही बुखारी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

हिंदूवरील अत्याचार सुरूच

शेख हसीना यांच्या देश सोडून गेल्यानंतर सत्तापालट झाली आणि मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आले. अंतरिम सरकार सत्तेत आल्यानंतरही बांगलादेशात हिंदू समुदायावरील ह्ल्ले सुरूच आहेत. चिन्मय दास आणि त्यांच्यासह आणखी दोन हिंदू व्यक्तींच्या अटकेनंतर हा हिंसाचार अधिक उफाळला आहे. चितगाव येथील इस्कॉन पुंडरिक धामचे अध्यक्ष चिन्मय प्रभू यांच्या अटकेनंतर परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. चिन्मय प्रभू यांच्या अटकेच्या निषेध करत हजारो हिंदू लोक रस्त्यावर उतरले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इस्त्रायलचे गाझावरील हल्ले तीव्र; हल्ल्यात 14 ठार, नागरिकांना घरे खाली करण्याचे आदेश

Web Title: Bangladesh hindu voilence delhi jama masjid shahi imam syed ahmed bukhari letter to bangladesh government sying stop hate and injustice agianst hindu nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 12:09 PM

Topics:  

  • Bangladesh
  • world

संबंधित बातम्या

Smallest University: जगातील सर्वात छोटे युनिव्हर्सिटी कॅम्पस! जिथे आहेत फक्त ३ क्लासरूम्स, तरीही येथे….
1

Smallest University: जगातील सर्वात छोटे युनिव्हर्सिटी कॅम्पस! जिथे आहेत फक्त ३ क्लासरूम्स, तरीही येथे….

आईच्या निधनानंतर अवघ्या ५ तासांच्या पेरोलवर जेलमधून बाहेर आले चिन्मय दास, डोळ्यात दाटले अश्रू अन् भावूक क्षणांचा Video Viral
2

आईच्या निधनानंतर अवघ्या ५ तासांच्या पेरोलवर जेलमधून बाहेर आले चिन्मय दास, डोळ्यात दाटले अश्रू अन् भावूक क्षणांचा Video Viral

BRICS Summit 2026: बांगलादेशला निमंत्रण होते, पण नव्हतेही; तारिक रहमान यांच्या नाराजीचे खरे कारण उघड; ब्रिक्स निमंत्रणावरून वाद
3

BRICS Summit 2026: बांगलादेशला निमंत्रण होते, पण नव्हतेही; तारिक रहमान यांच्या नाराजीचे खरे कारण उघड; ब्रिक्स निमंत्रणावरून वाद

Ganga Treaty: 1996 चा गंगा पाणी करार आला संपुष्टात; बिहारच्या ‘या’ मागणीमुळे भारत-बांगलादेश संबंधांत तणाव?
4

Ganga Treaty: 1996 चा गंगा पाणी करार आला संपुष्टात; बिहारच्या ‘या’ मागणीमुळे भारत-बांगलादेश संबंधांत तणाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.