फोटो सौजन्य: सोशल मीडिया
उत्तरी गाझा: इस्त्रायलने उत्तरी गाझामध्ये पुन्हा एकदा तीव्र हल्ले केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये 14 जण ठार झाले आहेत. तसेच गाझातील नागरिकांना इस्त्रायलने घरे रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. इस्त्रायलने गाझाच्या उत्तरी भागांतील बीट लाहिया शहरावर हल्ले केले आहेत. या हल्ल्यात अनेक पॅलेस्टिनी नागरिक मृत्यूमुखी पडले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. त्यांच्या या हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शरणार्थी छावण्यांवर हल्ले
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जबालिया शरणार्थी छावणीवर देखील हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. ऑक्टोबरपासून इस्रायली सैन्य जबालिया, बेत लाहिया आणि बेत हनून या शहरांमध्ये मोहीम राबवत आहे.
इस्रायली सैन्याच्या माहितीनुसार, या मोहिमेत आतापर्यंत शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.इस्त्रायल सैन्याच्या म्हणण्यानुसार त्यांनी नागरिकांच्या आड लपणाऱ्या दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी हे हल्ले केले आहेत. तर दुसरीकडे हमास आणि इस्लामिक दहशतवादी गटांच्या म्हणण्यानुसार त्यांनी अनेक इस्त्रायली सैन्याचा याचदरम्यान खात्मा केला आहे.
पॅलेस्टिनींचा इस्त्रायलवर आरोप
पॅलेस्टिनी लोकांचा आरोप आहे की इस्रायल त्यांना जबरदस्तीने घरातून लोकांनी बाहेर काढून उत्तरेकडील भागात ‘बफर झोन’तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. इस्रायली सैन्याने मात्र हे आरोप फेटाळून लावत म्हटले आहे की, त्यांचा उद्देश हमासच्या लढवय्यांना पुन्हा एकत्र येण्यापासून रोखणे असल्याचे लष्कराने म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जबलिया बीट लाहिया आणि बीट हानौनमधील हल्ले इंधन कमरतेमुळे थांबवण्यात आले होते.
फोटो सौजन्य: Shutterstock
मात्र, इस्त्रायलने आता पुन्हा मध्य आणि दक्षिण गाझा पट्टीतील हल्ले सुरू केले आहेत. इस्त्रायली सैन्याने म्हटले आहे की, हल्ला करण्यापूर्वी त्यांनी दक्षिणेकडील युनिस शहराच्या रहिवाशांना बाहेर काढण्याचे आदेश दिले आहे. तसेच या भागांत अतिरेक्यांनी रॉकेट हल्ले केला असल्याचा दावा इस्त्रायलने केला आहे.
गाझा पट्टी उद्ध्वस्त
संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, इस्त्रायलच्या हल्ल्यांमुळे गाझा उत्तरी भाग सुरक्षित नाही. गाझाच्या 2.3 दशलक्ष लोकांपैकी बहुतेक लोक विस्थापित झाले आहे. गेल्या वर्षभरात सुरू असलेल्या संघर्षामुळे गाझा पट्टी उद्ध्वस्त झाली आहे. इस्रायली सैन्य कारवाईत 44,400 हून अधिक पॅलेस्टिनी मरण पावले आहेत, तर अनेक इमारती मलब्यात रूपांतरित झाल्या आहेत. या गंभीर परिस्थितीत मानवीय मदतीची नितांत आवश्यकता आहे, मात्र युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.