Bangladesh as ex-President leaves for Thailand
ढाका: बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा राजकीय गोंधळ सउढाला आहे. बांगलादेशचे माजी राष्ट्रपती मोहम्म अब्दुल हमीद यांनी देश सोडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हमीद देश सोडून थांयलंडला रवाना झाले असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हमीद यांनी घाईघाईत देश सोडला. यामुळे त्यांच्या देश सोडून जाण्याने बांगलादेशात मोठा गोंधळ सुरु आहे. तसेच त्यांच्या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
अब्दुल हमीद २०१३ ते २०२३ पर्यंत दहा वर्षे बांगलादेशचे राष्ट्रपती होते. शेख हसीना यांच्या अवीम लीग पक्षाशी त्यांचा संबंध आहे. त्यांच्यावर अनेक खटले सुरु आहे. नुकतेच बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्म युनूस यांनी शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षावर बंदी घातली आहे.
माजी राष्ट्रपती अब्दुल हमीद गुप्तपणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन थायलंडला पळून गेले. यामुळे मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्त्वाखालील अंतरिम सरकारने विमानतळाच्या अधिकाऱ्यांना काढू टाकवले आहे. तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती हमीद यांच्यावर शेख हसीनाविरुद्धच्या आंदोलनादरम्यान भ्रष्टाचार आणि निदर्शकांवार कारवाई केल्याने त्यांच्यावर चौकशी बसवण्यात आली होती. त्यांच्यावर खूनाचा आरोप देखील करण्यात आला आहे.
दरम्यान यंदा मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने शिक्षण सल्लागार सीआर अबरार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलआ आहे. ही समिती माजी राष्ट्रपतींच्या देश सोडून जाण्याच्या प्रकरणाची चौकशी करत आहे
दरम्याने प्रकरणाच्या चौकशीवेळ माजी राष्ट्रपती अब्दुल हमीद यांच्या कुटुंबाने ते उपचारासाठी थायलंडला गेले असल्याचे म्हटले आहे. हमीद यांच्या देश सोडून गेल्यानंतर त्यांच्या राजकीय विरोधकांनी म्हटले आहे की, त्यांनी खटल्यापासून वाचण्यासाठी पळ काढला आहे.
जानेवरीमध्ये अब्दुल हमीद यांच्या एका खूनाच्या प्रकरणात खटला दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती बांगलादेशच्या माध्यमांनी दिली.शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य शेख रेहाना, सजीब वाजेद, जॉय आणि सायमा वाजेद पुतुल यांच्यावर देखील खूनाजचा आरोप करण्यात आला आहे.
बांगलादेशमध्ये गेल्या वर्षापासून मोठा राजकीय गोंधळ सुरु आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीनांविरोधात झालेल्या निदर्शनांमध्ये अवामी लीग सरकार कोसळले असून सध्या त्यांच्या पक्षावरही बंदी घालण्यात आली आहे. आतापर्यंत शेख हसीना, अब्दुल हमीद आणि अवामी लीगचे अनेक नेते बांगलादेशसोडून गेले असल्याचे म्हटले आहे.