
Saudi VS UAE
मिळालेल्या माहितीनुसार, येमेनमधील यूएई आणि सौदी अरेबियामधील संघर्, वाढला आहे. दोन्ही देशांमध्ये २०१५ पासून गृहयुद्ध सुरु आहे. दरम्यान नुक्त्यातच झालेल्या संघर्षात सौदीने यूएईचा पराभव केला असून हा मोठा झटका मानला जात आहे. यूएईने येमेनमधील तेल आणि गॅसचा सर्वात समृद्ध साठा असलेल्या प्रांता हद्रामौतवर पुन्हा एकदा नियंत्रण मिळवले आहे. यामुळे यूएईला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान सौदी अरेबियाच्या या कारवाईनंतर येमेनमधील यूएई समर्थित साऊदर्न ट्रांजिशनल (STC) गटाला हद्रामौत सोडून जावे लागले आहे. येमेनच्या सौदी समर्थित सरकारने हद्रामौतची राजधानी मुकाल्ला पुन्हा ताब्यात घेतली आहे.
शनिवारी (०३ जानेवारी २०२६) अमेरिकेच्या व्हेनेझुएलावर कारवाईकडे जगाचे लक्ष असतानाच येमेनमध्ये सौदीने यूएईचा पराभव केला. येमेनच्या सौदी समर्थित सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सौदीच्या नॅशनल शील्ड फोर्सेसने हद्रामौत येथे STC च्या लष्करी छावण्या आणि सुरक्षा स्थळे पुन्हा ताब्यात घेतली आहेत. यामुळे हा यूएईसाठी मोठा धक्का मानला जात आहे. सौदी समर्थित सरकारने यूएई समर्थित गट STC ला हद्रामौतमधून माघार घेण्यास भाग पाडले आहे.
सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) सुरुवातील येमेनमधील हुथी बंडखोरांविरोधात एकत्रित आले होते. पंरतु येमेनमदील तेल आणि गॅस साठ्यावरील वर्चस्वावरुन दोन्ही देशांत मतभेद निर्माण होऊ लागले. दोन्ही देशांमध्ये २०१५ मध्ये गृहयुद्धाला सुरुवात झाली होती. तेव्हापासून दोन्ही देशांत सतत संघर्षचे वातावरण होते.
सध्या या कारवाईमुळे यूएई आणि सौदीमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. परिणामी दोन्ही देशांच्या समर्थित गटांमध्ये पुन्हा एकदा गृहयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. यामुळे येमेनमध्ये अस्थिरता निर्माण होण्याची संकेत मिळाले आहेत.
Ans: सौदी आणि यूएईने सुरुवातील हूथी बंडखोरांविरोधात एकत्रित कार्य केले होते. परंतु सौदी येमेनला एकसंध ठेवू इच्छित आहे, तर यूएई त्याला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देऊ इच्छित आहे. यामुळे दोन्ही देशात वाद सुरु आहे.
Ans: STC ही यूएई समर्थित संघटना असून या संघटनेने दक्षिण येमेनच्या स्वातंत्र्याची मागणी केली आहे. या संघटनेला यूएईकडून शस्त्रे आणि राजकीय पाठबळ मिळते.
Ans: हदरामौत हा येमेनमधील तेल आणि गॅसने सर्वात समृद्ध प्रांत असल्याने हा आर्थिक आणि रणनीतिकदृष्ट्या अंत्यत महत्त्वाचा आहे.
Ans: सौदी समर्थित नॅशनल शील्ड फोर्सने लष्करी कारवाई करत STC च्या नियंत्रणाखालील छावण्या आणि सुरक्षा ठिकाणांना पुन्हा ताब्यात घेतले आहे.
Ans: येमेनमधील सौदी-यएई संघर्षामुळे येमेनमध्ये गृहयुद्धाचा पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे.