
Bangladesh Osman Hadi demise Who is this Osman Hadi Whose murder sparked violence across Bangladesh
Sharif Osman Hadi death Singapore : बांगलादेशच्या (Bangladesh) राजकारणात सध्या प्रचंड अस्वस्थता असून, त्यातच एका मोठ्या बातमीने देशाला हादरवून सोडले आहे. जुलै २०२४ च्या ऐतिहासिक विद्यार्थी उठावात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि ‘इन्कलाब मंच’चे आक्रमक प्रवक्ते शरीफ उस्मान हादी (Sharif Osman Hadi) यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. १८ डिसेंबर २०२५ रोजी सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर बांगलादेशमध्ये शोकाकुळ वातावरण असून संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेची सुरुवात १२ डिसेंबर २०२५ रोजी झाली. उस्मान हादी हे ढाका येथील पलटन परिसरातून ऑटो-रिक्षाने प्रवास करत होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर भररस्त्यात गोळीबार केला. एक गोळी थेट त्यांच्या डोक्यात लागली आणि ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. सुरुवातीला त्यांना ढाका मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले, परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने एअरलिफ्ट करून सिंगापूरला नेण्यात आले होते. सिंगापूरच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी सहा दिवस शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यांची प्राणज्योत मालवली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Vijay Mallya : कर्ज बुडवलं पण स्वॅग तसाच! मल्ल्याच्या वाढदिवसाला लंडनमध्ये जमला ‘या’ सर्वच फरार उद्योगपतींचा मेळावा
झलकाठी जिल्ह्यातील एका सामान्य मदरसा शिक्षकाच्या पोटी जन्मलेले हादी हे अभ्यासात अत्यंत हुशार आणि शिस्तप्रिय होते. जुलै २०२४ मध्ये जेव्हा शेख हसीना सरकारविरुद्ध विद्यार्थ्यांचा उठाव झाला, तेव्हा हादी हे एक प्रमुख रणनीतीकार म्हणून समोर आले. त्यांनी ‘इन्कलाब मंच’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद केला होता. विशेष म्हणजे, येत्या फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी त्यांनी ढाका-८ मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर केली होती, ज्यामुळे ते अनेकांच्या डोळ्यात खुपत होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : HIMARS : चीनच्या नाकावर टिच्चून! अमेरिकेने तैवानला बनवले ‘पॉवरहाऊस’; अखेर रणनीतिक महाकराराला अधिकृत मान्यता
हादी ज्या ‘इन्कलाब मंच’चे नेतृत्व करत होते, ती संघटना बांगलादेशात नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे. या संघटनेवर अनेकदा कट्टरपंथी विचारसरणीचे आरोप झाले. शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर अंतरिम सरकारने काही विद्यार्थी संघटनांवर निर्बंध आणले होते, तरीही हादी आणि त्यांचे सहकारी राजकीय पातळीवर सक्रिय राहिले. त्यांच्या हत्येमागे राजकीय कट असल्याचा संशय आता व्यक्त केला जात असून, यामुळे बांगलादेशमधील अंतरिम सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.शरीफ उस्मान हादी यांचे निधन हा बांगलादेशातील विद्यार्थी चळवळीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या हत्येचे पडसाद आता रस्त्यांवर उमटत असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश पुन्हा एकदा हिंसाचाराच्या वळणावर उभा आहे की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.
Bangladeshi Islamist Osman Hadi who was shot by Yunus regime sponsored gunmen has succumbed to his injuries This is going to escalate protest againt Yunus regime pic.twitter.com/qNCuX6RguJ — Frontalforce 🇮🇳 (@FrontalForce) December 18, 2025
credit : social media and Twitter
शरीफ उस्मान हादी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा तपास करताना बांगलादेशच्या गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांनी फयसल करीम मसूद (Foysal Karim Masud) याला मुख्य आरोपी म्हणून घोषित केले आहे. मसूद हा ‘छात्र लीग’ (अवामी लीगची विद्यार्थी संघटना) चा माजी नेता असल्याचे सांगितले जात आहे. मसूदने आपला साथीदार आलमगीर हुसेन याच्यासह १२ डिसेंबर रोजी एका मोटारसायकलवरून येत हादी यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. ढाका महानगर पोलिसांनी (DMP) दिलेल्या माहितीनुसार, या हत्येनंतर हे आरोपी भारताच्या सीमेकडे पळाल्याचा संशय आहे, ज्यामुळे बांगलादेश सरकारने भारतीय दूतावासाकडे या आरोपींना पकडण्यासाठी सहकार्य मागितले आहे. या प्रकरणात मसूदचे आई-वडील, पत्नी आणि एका महिला मैत्रिणीला पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले आहे. हा हल्ला केवळ वैयक्तिक वैमनस्यातून नसून, फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये हादी यांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी रचलेला एक ‘राजकीय कट’ असल्याचे मानले जात आहे.
Ans: उस्मान हादी हे बांगलादेशातील 'इन्कलाब मंच' या विद्यार्थी संघटनेचे प्रवक्ते आणि जुलै २०२४ च्या विद्यार्थी उठावातील प्रमुख नेते होते.
Ans: १२ डिसेंबर २०२५ रोजी बांगलादेशची राजधानी ढाका येथील पलटन भागात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता.
Ans: डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे त्यांना सिंगापूरला नेण्यात आले होते, जिथे १८ डिसेंबर २०२५ रोजी सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले.