Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांग्लादेशात राजकीय भूकंप! अंतरिम पंतप्रधान मोहम्मद युनूस राजीनाम्याच्या तयारीत, लष्कर व विरोधकांशी संघर्ष तीव्र

Muhammad Yunus resignation : बांगलादेश सध्या एका अत्यंत गंभीर आणि अस्थिर राजकीय संकटातून जात आहे. अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 23, 2025 | 12:12 PM
Bangladesh PM Yunus set to resign amid army-opposition clashes

Bangladesh PM Yunus set to resign amid army-opposition clashes

Follow Us
Close
Follow Us:

Muhammad Yunus resignation : बांगलादेश सध्या एका अत्यंत गंभीर आणि अस्थिर राजकीय संकटातून जात आहे. अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी सल्लागार परिषदेच्या ताज्या बैठकीत सांगितले की, “या परिस्थितीत मला स्वतःला एखाद्या ओलिसासारखे वाटत आहे,” ही भावना देशातील सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या अस्थिरतेचे प्रतिक ठरत आहे.

राजकीय व्यवस्थेचे अपयश, युनूस यांची हतबलता

युनूस यांनी स्पष्टपणे सांगितले की, सद्यस्थितीत राजकीय सहमती तयार होणे अशक्य होत आहे आणि त्यामुळे एक कार्यक्षम प्रशासन चालवणे देखील अवघड झाले आहे. हे केवळ त्यांचे वैयक्तिक अपयश नाही, तर संपूर्ण राजकीय व्यवस्थेचे अपयश असल्याचे ते म्हणाले. राजकीय पक्षांमध्ये संवादाची कमतरता आणि निर्णयक्षमतेचा अभाव यामुळे ते प्रचंड दबावाखाली आहेत.

मानवतावादी कॉरिडॉरवरून लष्कर असंतुष्ट

या संकटाचे मुख्य कारण म्हणजे, युनूस सरकारने अमेरिकेच्या सहकार्याने बांगलादेश-म्यानमार सीमेवर एक मानवतावादी कॉरिडॉर स्थापन करण्याची योजना आखली होती. ही योजना गुप्तपणे ठरवण्यात आली होती, ज्यामुळे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान संतप्त झाले. त्यांनी थेट डिसेंबरपर्यंत निवडणुका घेण्याचा अल्टिमेटम सरकारला दिला आहे. यामुळे नागरी सरकार आणि लष्करामध्ये संघर्ष उफाळून आला आहे. ही परिस्थिती केवळ तात्पुरती अस्थिरता दर्शवत नाही, तर भविष्यातील सामाजिक आणि राजकीय संघर्षाचे संकेत देत आहे. लष्कराचा युनूस सरकारवरील विश्वास उडाल्यामुळे संविधानिक स्थैर्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जग अंधारात बुडणार? भयानक सौर वादळ सरकत आहे पृथ्वीच्या दिशेने; भोगावे लागणार गंभीर परिणाम

विरोधी पक्ष आणि विद्यार्थ्यांचा रोष उफाळला

युनूस सरकारविरोधात विरोधी पक्ष, विद्यार्थी संघटना आणि सामान्य जनता सडकोंवर उतरली आहे. देशभरात निवडणुका घेण्याची मागणी करत निदर्शने करण्यात येत आहेत. या निदर्शांमध्ये महफूज आसिफ आणि खलीलूर रहमान यांच्यासारख्या वादग्रस्त मंत्र्यांना पदावरून हटवण्याचीही जोरदार मागणी केली जात आहे. याचा परिणाम असा झाला की, सध्याच्या सरकारचा लोकशाहीवरील विश्वास गमावत चालला आहे. हे सरकार आता सर्व स्तरांवर असमर्थ आणि अलोकप्रिय ठरू लागले आहे.

शेख हसीनाच्या पलायनानंतर युनूस सरकार स्थापन झाले

या संपूर्ण संकटाचा सुरुवात शेख हसीना यांच्यावरील सत्तापालट आणि भारतात पलायन झाल्यानंतर झाली होती. त्यानंतर स्थापन झालेले युनूस सरकार हे केवळ अंतरिम स्वरूपाचे होते आणि त्यांना कायमस्वरूपी सरकार स्थापन होईपर्यंत स्थिरता राखण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आजच्या घडीला हा प्रयोग अपयशी ठरल्याचे चित्र स्पष्टपणे समोर आले आहे. लष्कराचा दबाव, राजकीय पक्षांची नाराजी, आणि जनतेचा रोष पाहता युनूस सरकारचा अस्त जवळ आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताचे जेम्स बाँड अजित डोवाल यांनी पाकिस्तानमधून सरकारला पाठवली होती ‘त्यांची’ गुप्त माहिती; वाचा ‘ही’ चित्तथरारक कहाणी

 बांगलादेश निर्णायक वळणावर

संपूर्ण परिस्थिती पाहता, बांगलादेश एका निर्णायक वळणावर उभा आहे. जर लवकरच व्यापक राजकीय संवाद आणि लोकशाही प्रक्रियेला चालना देण्यात आली नाही, तर देश अराजकतेच्या दिशेने जाऊ शकतो. युनूस यांचा संभाव्य राजीनामा हा केवळ एका नेत्याचा निर्णय नसून, पूर्ण यंत्रणेच्या अपयशाचे प्रतीक ठरत आहे. आता बांगलादेशसमोरील प्रश्न असा आहे की, या संकटावर तो कसा मात करतो आणि लोकशाहीचा मार्ग टिकवून ठेवतो का?

Web Title: Bangladesh pm yunus set to resign amid army opposition clashes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 12:12 PM

Topics:  

  • Bangladesh
  • india
  • international news
  • Mohammad Yunus

संबंधित बातम्या

Sergio Gor : भारत-अमेरिका संबंधांच्या कठीण टप्प्यात ट्रम्पचे निर्णायक पाऊल, सर्जियो गोर यांच्याकडे ‘राजदूत’ पदाची धुरा
1

Sergio Gor : भारत-अमेरिका संबंधांच्या कठीण टप्प्यात ट्रम्पचे निर्णायक पाऊल, सर्जियो गोर यांच्याकडे ‘राजदूत’ पदाची धुरा

Asia Cup 2025: अशिया कपसाठी बांगलादेश संघाची घोषणा, तीन वर्षांनी ‘या’ खेळाडूचं कमबॅक; शांतो संघाबाहेर
2

Asia Cup 2025: अशिया कपसाठी बांगलादेश संघाची घोषणा, तीन वर्षांनी ‘या’ खेळाडूचं कमबॅक; शांतो संघाबाहेर

श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती Ranil Wickremesinghe यांना अटक, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
3

श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती Ranil Wickremesinghe यांना अटक, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

India–Russia Relations : भारतीय अजूनही रशियन सैन्यात… जयशंकर यांची रशियाकडे ‘ही’ आग्रहपूर्ण मागणी, मॉस्को मदतीस तयार
4

India–Russia Relations : भारतीय अजूनही रशियन सैन्यात… जयशंकर यांची रशियाकडे ‘ही’ आग्रहपूर्ण मागणी, मॉस्को मदतीस तयार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.