
Muhammad Yunus
Bangladesh News : बांगलादेशी नेत्यांची उडाली भंबेरी! हादीच्या हत्येनंतर गन लायसन्ससाठी झुंबड
मोहम्मद युनूस यांनी सांगितले आहे की, बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुका या ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत. १२ फेब्रुवार २०२६ रोजी या निवडणुका होणार असल्याचे युनूस यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले आहे की, सरकार निवडणूकासाठी पूर्णपणे तयार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युनूस यांनी ही घोषणा अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांच्याशी फोनवरुन संवाद साधल्यानंतर केली आहे. त्यांनी सोशल मीडियावरुन याची माहिती दिली.
मोहम्मद युनूस यांनी स्पष्ट केले आहे की, बांगलादेशातील लोक मतदानाचा अधिकार वापरण्यासाठी वाट पाहत आहे. गेल्या वर्षीच्या सरकारचे हा अधिकार हिसकावून घेतला होता. मात्र यावेळ देशात पुनर्संचयितपण मुक्त, निष्पक्ष आणि शांततापूर्ण निवडणुका होतील असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांना सांगितले की अंतरिम सराकराचा हेच प्रथन उद्दिष्ट राहिल.
युनूस यांच्या नते, त्यांनी अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांच्याशी सोमवारी (२२ डिसेंबर) सुमारे अर्धतास चर्चा केली.यावेळी त्यांनी बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेवर, उस्मान गाहीच्या हत्येवर चर्चा केली. तसेच त्यांनी अमेरिका आणि बांगलादेशच्या व्यापर संबंधावरही चर्चा केली.
दरम्यान युनूस यांनी म्बटले की, देशात हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करणारे नेते फरार झाले आहेत. शेख हसीना (Sheikh Hasina) यांचे नाव न घेता पदच्युत सरकारचे समर्थक निवडणूक प्रक्रियेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा त्यांनी केला. परंतु अंतरिम सराकर सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज असून ठरलेल्या वेळापत्रकानुसार, १२ फ्रेबुवारी २०२६ ला सार्वत्रिक निवडणुका पार पडतील. निवडणूका पूर्णपणे निष्पक्ष होतील असे युनूस यांनी आश्वासन दिले आहे. सध्या निवडणुकीसाठी ५० दिवस उरले आहेत. अंतरिम सरकार निवडणुका मुक्त, निष्पक्ष आणि शांततेत घेण्यासाठी त्यावर लक्ष केंद्रित करुन असल्याचे युनूस यांनी म्हटले
Osman Hadi : उस्मान हादीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा! परदेशात पळून गेला मारेकरी? जाणून घ्या
Ans: बांगलादेशात पुढील सार्वत्रिक निवडणुका १२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहेत.
Ans: मोहम्मद युनूस यांनी सार्वत्रिक निवडणुका ठरलेल्या वेळनुसारच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Ans: बांगलादेशात पुढील सार्वत्रिक निवडणुका मुक्त, निष्पक्ष आणि शांततापूर्ण परिस्थिती घेण्याचे उद्दिष्ठ अंतरिम सराकरेने ठेवले आहे.