
India Bangladesh News:
बांगलादेश सरकार ने भारताविरुद्ध कारवाया करण्यासाठी त्यांच्या जमीनीचा पुरेपुर वापर करण्याचे सर्व प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी पाकिस्तानला काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त नकाशा भेट म्हणून दिला होता. अलीकडेच, मोहम्मद युनूस यांनी हा वादग्रस्त नकाशा पाकिस्तानचे वरिष्ठ लष्करी अधिकारी जनरल साहिर शमशाद मिर्झा यांना भेट म्हणून दिला होता. त्यानंतर आता तुर्कीच्या संसदीय शिष्टमंडळाला आर्ट ऑफ ट्रायम्फ भेट म्हणून दिले. य नकाशात भारताचे पुर्वेकडील भाग बांगलादेशातील प्रदेश म्हणून दाखवण्यात आला आहे.
बांगलादेश सरकारने अलीकडेच जाणीवपूर्वक प्रसिद्ध केलेला नकाशा चर्चेचा विषय ठरला आहे. तो कोणतीही कलाकृती नसून, आंतरराष्ट्रीय इस्लामिक देशांना संकेत देण्यासाठी प्रसिद्ध केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या नकाशानंतर तुर्की आणि बांगलादेश यांच्यातील वाढते लष्करी सहकार्य आणि राजनैतिक संपर्क अधिक बळकट होत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांनी अलीकडेच तुर्की शिष्टमंडळाला दिलेल्या दस्तऐवजात भारतासोबतच्या संभाव्य युद्धासंबंधी आणि त्यानंतरच्या घटनांबाबत तपशीलवार योजना समाविष्ट असल्याचे वृत्त आहे. भारत या संपूर्ण घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असून, गुप्तचर संस्थांनी संबंधित हालचालींचा सखोल तपास सुरू केला आहे.
दरम्यान, तुर्कस्तान सध्या नवीन लष्करी करारांच्या शोधात असून या हालचालींची वेळ अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. लष्करी सहकार्य आणि ड्रोन तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे तुर्की दक्षिण व आग्नेय आशियात, विशेषतः इस्लामिक देशांमध्ये, आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. २०२४ च्या सुरुवातीपासून तुर्कीने बांगलादेशशी संबंध सुधारण्यावर भर दिला आहे. संरक्षण उद्योगातील सहकार्य आणि तंत्रज्ञान गुंतवणुकीच्या ऑफरद्वारे दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
‘या’ देशांकडून गुपचूप….; डोनाल्ड ट्रम्प यांच्या खळबळजनक दाव्याने वाढणार भारताची धडधड
१९७१ नंतर पहिल्यांदाच बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधात वाढ झाली आहे. ढाका आता पाकिस्तान गुप्तचर संस्था आयएसआयचा नवीन तळ बनल्याची माहिती समोर आली आहे. अलीकडच्या काळात पाकिस्तान आणि त्याच्या प्रायोजित दहशतवादी संघटनांच्या कारवायांमध्ये बांगलादेशातील सक्रियता वाढल्याचे सुरक्षा यंत्रणांनी नोंदवले आहे. दरम्यान, एका वरिष्ठ पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याने आयएसआय कमांडरसह पाकिस्तानला दिलेल्या भेटीदरम्यान दोन्ही देशांतील गुप्तचर माहितीची देवाणघेवाण अधिक सुलभ झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.