us president donald trump (फोटो - सोशल मीडिया )
Donald Trump News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खळबळजनक दावा केला आहे. उत्तर कोरिया, रशियासोबतच आता पाकिस्तान-चीनसुद्धा गुपचूप अण्वस्त्र चाचण्या करत असल्याचा गंभीर खुलासा ट्रम्प यांनी केला ही बाब भारतासाठी धोक्याची घंटा असू शकते.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. ३३ वर्षांनंतर अमेरिका अण्वस्त्र चाचणी करत असून खुद्द ट्रम्प यांनी तसे आदेश दिले आहेत. या मागची भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी मीडियासमोर मांडली. यावेळी पाकिस्तान आणि चीन दोघेही गुपचूप अण्वस्त्र चाचण्या करत असल्याचा धक्कादायक खुलासा ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांनी अण्वस्त्र चाचण्या संबंधित केलेला हा खुलासा भारतासाठी चिंताजनक असून, भारताच्या शेजारील दोन्ही देश अण्वस्त्र चाचण्या करत असल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
हेही वाचा : Who is Rob Jetten: कोण आहे नेदरलॅंडचे रॉब जेटन ? जे बनू शकतात जगातील पहिले समलिंगी पंतप्रधान…
रशिया-चीन दोन्ही देश अण्वस्त्र चाचण्या करत असूनही याबद्दल उघडपणे बोलत नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हंटले आहे. पाकिस्तानवरही गंभीर आरोप करत अमेरिकेच्या अध्यक्षांनी पाकिस्तानकडून भूमीगत चाचण्या सुरु असल्याने त्यांचा शोध घेता येत नसल्याचे सांगितले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सनसनाटी दाव्याने जगभरात खळबळ माजली असून भारतासाठी ही धोक्याची घंटा असू शकते.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान युद्ध झाले होते. त्याची तीव्रता इतकी होती कि अण्वस्त्र युद्ध होऊ शकले असते. मात्र, त्यांच्या मध्यस्थीने युद्ध टाळल्याचा दावा त्यांनी पुन्हा एकदा केला आहे. ‘भारत आणि पाकिस्तानमध्ये मे महिन्यात युद्ध झाले होते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जायला लागल्यावर संघर्ष अगदी अण्वस्त्रापर्यंत पोहोचला होता. परंतु, मी त्यांना टॅरिफ आणि व्यपाराच्या धमक्या देऊन दोन्ही देशातील युद्ध नियंत्रणात आणले. त्यामुळे लाखो लोकांचे प्राण अमेरिकेच्या हस्तक्षेपाने वाचले. अमेरिका ‘तुम्ही जर युद्ध थांबवलं नाही. तर, कोणताही करार करणार नाही’ असा इशारा दोन्ही देशांना दिल्यानंतर त्यांच्यातील युद्ध थांबले.’ असे वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.
हेही वाचा : Donald Trump News: ‘आमच्याकडे इतके अणुबॉम्ब की १५० वेळा जग नष्ट होईल’; डोनाल्ड ट्रम्पचा धक्कादायक दावा
यापूर्वी भारतानं १९९८ साली अण्वस्त्र चाचणी पोखरणमध्ये केली होती. पाकिस्तान-चीन दोन्ही देश गुप्तपणे अण्वस्त्र चाचण्या करत असल्याच्या खुलासाने भारतासाठी ही बाब चिंताजनक आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाव्यामुळे भारताला पोखरण -3 ची संधी उपलब्ध होऊ शकते.






