जर जोहरान ममदानी महापौर झाले तर...; निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्पची न्यू यॉर्कला धमकी
New York Mayor Election: अमेरिकेचे न्यू यॉर्क शहराच्या महापौरपदाची निवडणूक मंगळवारी (४ नोव्हेंबर) होणार आहे. भारतीय वंशाचे जोहरान ममदानी हे एक प्रबळ दावेदार मानले जात आहेत, परंतु अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र या जोरदार विरोध केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ममदानी महापौर झाल्यास न्यू यॉर्कच्या निधीत कपात करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. ममदानी हे महापौरपदाच्या इतर दोन प्रमुख दावेदारांपैकी एक आहेत.
भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याविरुद्धच्या भाषणांमुळे ममदानी सध्या चांगलेच चर्चेत आहेत. ट्रम्प यांनाही ममदानी आवडत नाहीत. असे असूनही, त्यांना महापौरपदासाठी एक प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे. महापौरपदासाठी मतदान मंगळवारी भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होईल.
Who is Rob Jetten: कोण आहे नेदरलॅंडचे रॉब जेटन ? जे बनू शकतात जगातील पहिले समलिंगी पंतप्रधान…
न्यू यॉर्क : न्यू यॉर्क शहरातील महापौरपदाची निवडणूक ही पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळी आणि अधिक समावेशक प्रणालीतून पार पडते. येथे ‘रँक्ड-चॉइस व्होटिंग’ (Ranked Choice Voting) प्रणालीचा अवलंब केला जातो.या प्रणालीनुसार, मतदार आपल्या पसंतीनुसार तीन उमेदवारांना क्रमांक देतात — पहिली, दुसरी आणि तिसरी पसंती म्हणून. जर कोणत्याही उमेदवाराला पहिल्या पसंतीच्या ५० टक्क्यांहून अधिक मते मिळाली नाहीत, तर सर्वात कमी मते मिळालेला उमेदवार बाद होतो.
यानंतर, त्याच्याकडे पडलेली मते उर्वरित उमेदवारांना दुसऱ्या पसंतीनुसार वाटली जातात. ही प्रक्रिया तेव्हाच संपते जेव्हा एखाद्या उमेदवाराला एकूण ५० टक्क्यांहून अधिक मते मिळतात.या पद्धतीमुळे मतमोजणीस अधिक वेळ लागतो, त्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यासाठी सुमारे एक आठवडा लागू शकतो. निवडणूक आयोगाच्या मते, ही प्रणाली मतदारांचा आवाज अधिक अचूकपणे प्रतिबिंबित करते आणि निकाल अधिक न्याय्य ठरतो.
भारतीय वंशाचे जोहरान ममदानी हे पहिले दावेदार मानले जातात. ते चित्रपट निर्मात्या मीरा नायर यांचे पुत्र आहेत. ममदानी हे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आहेत. न्यू यॉर्कचे माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत, जरी ते यापूर्वी डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य होते. रिपब्लिकन उमेदवार कर्टिस स्लिवा तिसऱ्या स्थानावर आहेत.
भारतीय वंशाचे जोहरान ममदानी हे न्यू यॉर्कच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेत असलेले नाव ठरत आहेत. परंतु राजकारणात येण्यापूर्वी ते हिप-हॉप रॅपर म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या “कांडा” या गाण्याने युगांडामध्ये लोकप्रियता मिळवली होती. या गाण्यात त्यांनी कंपालातील तरुणांच्या आयुष्याचे आणि सामाजिक विषमतेचे जिवंत चित्रण केले होते. “संगीताच्या माध्यमातूनच मला समाजातील असमानता आणि ओळखीच्या राजकारणाविरुद्ध आवाज उठवण्याची प्रेरणा मिळाली, असं ममदानी सांगतात.
महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर ते न्यू यॉर्कच्या क्वीन्स परिसरात स्थायिक झाले आणि तेथून त्यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. त्यांनी स्थलांतरित, भाडेकरू आणि ब्लॅक लाईव्ह्स मॅटर चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला. या काळात त्यांनी २०१७ मध्ये डेमोक्रॅटिक पक्षात प्रवेश करून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.
२०२० मध्ये ममदानी न्यू यॉर्क राज्य विधानसभेत निवडून आले आणि २०२२ व २०२४ मध्ये बिनविरोध विजयी झाले. आपल्या कार्यकाळात त्यांनी सामान्य नागरिकांच्या समस्या अग्रक्रमाने मांडल्या. त्यांनी परवडणाऱ्या घरांचा हक्क, मोफत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, तसेच किमान वेतन प्रति तास $३० (सुमारे ₹२,५७८) करण्याची मागणी केली.
आजपर्यंत ममदानी यांनी विधानसभेत २० विधेयकांना पाठिंबा दिला असून, त्यापैकी तीन विधेयके कायद्यात रूपांतरित झाली आहेत. विशेष म्हणजे, भाडे मर्यादांवरील विधेयकामुळे त्यांना शहरातील मध्यमवर्गीय आणि स्थलांतरित वस्त्यांमध्ये मोठा पाठिंबा मिळाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ममदानी यांनी सीरियन-अमेरिकन कलाकार रामा दुवाजी यांच्याशी विवाह केला. दोघांची ओळख एका डेटिंग अॅपवर झाली होती.






