Middle East मध्ये येणार मोठं वादळ? ट्रम्प यांनी इराणच्या दिशने धाडलं 'मृत्यूचं विमान', अणु करारावरुन नवा अल्टीमेटम (फोटो सौजन्य: AI जनरेटेड)
गाझा ते इराण…. Trump-Netanyahu यांच्यात तीन तास चर्चा; बंद दाराआड नेमकं काय घडलं?
कॅरोलिनामधील फोर्ट बर्ग येथील सैनिकांची भेट ट्रम्प यांनी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या संवादादरम्यान ट्रम्प यांनी सांगितले की, इराणमध्ये सत्तापरिवर्तन चांगली गोष्ट ठरु शकते. त्यांच्या या विधानावरुन इराणच्या धार्मिक नेतृत्वाला हटवण्याच्या तयारीत ट्रम्प असल्याचे दिसून येते. ट्रम्प यांनी हेही चांगले ठरु शकते असे म्हणत काही वेळा भिती निर्माण करण्याची देखील गरज असते असे म्हटले आहे. यावरुन ट्रम्प इराणवर नियंत्रण आणि दबाव ठेवत असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकने जगातील सर्वात मोठा विमानवाहू युद्धपोत USS Gerald R. Ford तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इतर काही युद्धनौकांची तैनाती देखील वाढवली आहे. अमेरिकेचे हे नवे विमानवाहू जहाज कॅरिबियन समुद्रातून रवाना होऊन मध्यपूर्वेत पोहचेल असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी असाही इशारा दिला की अमेरिका आणि इराणमध्ये सुरु असलेल्या अणु वाटाघाटी चर्चेवर कोणताही निकाल लागला नाही तर लष्करी पर्यायाचा वापर केला जाईल.
ट्रम्प यांनी हा निर्णय अशा वेळी जाहीर केला आहे, जेव्हा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंशी (Benjamin Netanyahu) त्यांनी मध्यपूर्वेतील परिस्थितीवर संवाद साधला. त्यांच्याशी संवादानंतर ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत इशारा दिला होता की, करार न झाल्यास अमेरिका-इ्स्रायल इराणवर लष्करी पर्यायाचा अवलंब करेल. सध्या इस्रायलच्या सुरक्षेच्या कारणास्तव ट्रम्प यांनी कोणत्याही हल्ल्याचे संकेत दिलेले नाही. शिवाय अमेरिका आणि इराणमधील अणु चर्चेला गेल्या आठवड्यात सुरुवात झाली असून ओमानच्या मध्यस्थीने ही चर्चा सुरु आहे. सध्या या चर्चेत कोणताही ठोस निकाल लागलेला नाही.
Ans: ट्रम्प यांनी इराणमध्ये सत्ता परिवर्तन सर्वात चांगली गोष्ट ठरेल असे म्हटले असून खामेनेईंना थेट इशारा दिला आहे.
Ans: मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका मध्यपूर्वेत हिंद महासागरात सैन्य तैनात करत आहे. नुकतेच अमेरिकेने USS Gerald R. Ford ही विमानवाहून युद्धनौका मध्यपूर्वेत तैनात केल आहे. तसेच इतर युद्धनौकांचीही संख्या वाढवली आहे.
Ans: अमेरिकेच्या या लष्करी हालचालीमुळे मध्य पूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अस्थिरतेचे आणि दहशतीचे वातावरण वाढण्याची शक्यता आहे.






