Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bharat-Pakistan Ceasefire LIVE Updates:पाकिस्ताने खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, युद्धबंदीच्या काही तासातच राजौरीमध्ये पुन्हा सुरू

पाकिस्तान कधीही आपल्या कारवायांपासून दूर राहणार नाही असंच आता म्हणावं लागेल. काही तासही उलटले नाहीत आणि पुन्हा एकदा भारताच्या राजौरी भागात पाकिस्तानने गोळीबार केल्याचे समोर आले आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 10, 2025 | 09:38 PM
पाकिस्तानने पुन्हा खुपसला खंजीर (फोटो सौजन्य - PTI)

पाकिस्तानने पुन्हा खुपसला खंजीर (फोटो सौजन्य - PTI)

Follow Us
Close
Follow Us:

पाकिस्तानने राजौरीमध्ये पुन्हा गोळीबार सुरू केला आहे. पाकिस्तानला शांतता अजिबात आवडत नाही असेच आता म्हणावे लागेल.  युद्धबंदी लागू होऊन चार तासही झाले नव्हते की पाकिस्तानने राजौरीमध्ये पुन्हा गोळीबार सुरू केला आहे. लोकांनी त्यांच्या घरातील दिवेही बंद केले. परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे असे वृत्तवाहिन्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे युद्धबंदीसाठी पुढे येऊन पाठीत खंजीर खुपण्यासारखेच हे झाले आहे आणि आता यावर भारताचा काय पलटवार असणार हे पहावे लागेल

जम्मूमधील आंतराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे आणि अवघ्या तीन तासांतच शस्त्रसंधीचे नुकसान झाल्याचेही दिसून आले आहे. याशिवाय पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला बीएसएफकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आल्याचेही समोर येत आहे. पाकिस्तानने काहीही केले तरीही भारतीय सेना तैनात असून कधीही स्वतःहून पहिल्यांदा हल्ला करणार नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे आणि आपल्या शब्दावर पाकिस्तान कधीही टिकून राहत नाही हेदेखील काही तासाताच जगालाही दिसून आले आहे. मात्र आता या हल्ल्यानंतर भारत पुन्हा काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

अमेरिका, इराण, सौदी..; भारत-पाकिस्तान युद्धविरामासाठी ‘या’ देशांनी निभावली मध्यस्थीची भूमिका

घोषणा आणि उल्लंघन 

पाकिस्तानकडून ५ः३० वाजता शस्त्रसंधीची घोषणा आणि ८ः३० वाजता उल्लंघन करण्यात आले आहे. पंजाबमधील फिरोजपूरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आले असून जम्मू आरएसपुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानककडून गोळीबार करण्यात आल्याचेही वृत्त आहे. पाकिस्तानने एका बाजूला शस्त्रसंधीची वाट धरली तर दुसऱ्या बाजूला एका प्रकारे भारताच्या पाठीत खंजीरच खुपसला आहे असं म्हणावे लागेल. ही एक प्रकारची फसवणूक असून आता पाकिस्तानला भारताकडून करारा जबाव मिळणे अत्यंत गरजेचे आहे. पाकिस्तानच्या कोणत्याही शहरातील लोकांना भारताने अजूनही उपद्रव केलेला नाही. मात्र पाकिस्तान सतत भ्याड हल्ले करत असल्याचे दिसून येत आहे.

Operation Sindoor: युद्धविरामापूर्वी भारताने पाकिस्तानला शिकवला ‘धडा’, राफेलने उडवली झोप, नक्की काय मिळाले?

पाकिस्तानी ड्रोन रोखले

जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूरमध्ये शनिवारी रात्री उशिरा ब्लॅकआउट दरम्यान भारतीय हवाई संरक्षण दलाने पाकिस्तानी ड्रोनला यशस्वीरित्या रोखले. परिसरात मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. त्याच वेळी श्रीनगरमध्ये स्फोटांच्या अफवा पसरल्या, ज्यावर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटमध्ये प्रश्न उपस्थित केला, ‘युद्धविरामाचे काय झाले?’ दरम्यान, राजस्थानमधील बारमेरमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण शहर अंधारात टाकण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जाहीर केला आहे. सीमेवर अजूनही तणाव कायम आहे.

ओमर अब्दुल्ला यांचे ट्वीट 

This is no ceasefire. The air defence units in the middle of Srinagar just opened up. pic.twitter.com/HjRh2V3iNW

— Omar Abdullah (@OmarAbdullah) May 10, 2025

20 मिनिटात श्रीनगरमध्ये 50 धमाके

शनिवारी रात्री उशिरा श्रीनगरमधील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे जेव्हा अवघ्या २० मिनिटांत ५० हून अधिक स्फोटांचे आवाज ऐकू आले. बेमिना परिसरातील पॉवर ग्रिड स्टेशनजवळ गोळीबार आणि स्फोटांचे दृश्य समोर आले आहेत. गुलमर्गमधूनही मोठ्या स्फोटांचे वृत्त आहे. असे म्हटले जात आहे की दाल तलाव, हरी पर्वत आणि लाल चौक यांना लक्ष्य केले जाईल. दुसरीकडे, संपूर्ण पठाणकोट जिल्हा पुन्हा अंधारात बुडाला आहे. सांबा येथेही वीजपुरवठा खंडित झाला आहे. राजस्थान सीमेवरील जिल्ह्यांमध्येही वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिस्थिती अजूनही अत्यंत संवेदनशील आहे.

9 पाकिस्तानी ड्रोन 

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात पाकिस्तानकडून होणारे ड्रोन हल्ले पुन्हा एकदा तीव्र झाले आहेत. शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तापासून जिल्ह्यात एकूण ९ पाकिस्तानी ड्रोन दिसले आहेत. हरामी नाला आणि जखोना भागात ६ हून अधिक ड्रोन हालचाली नोंदवण्यात आल्या, तर खावडा परिसरात तीन ड्रोन दिसले असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे हे वातावरण आता पुन्हा एकदा तणावात जाणार हे नक्की.

Web Title: Bharat pakistan ceasefire live updates pakistan has again started firing in rajouri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 08:56 PM

Topics:  

  • India Pakistan Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
1

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
2

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
3

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
4

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.