Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्करावर BLA चा हल्ला; १० सैनिक ठार

मार्गट हे बलुच बंडखोरीचे दीर्घकालीन केंद्र मानले जाते. येथे याआधीही अनेक वेळा सुरक्षा दलांवर हल्ले झाले आहेत. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी बीएलए ही गट अनेक वर्षांपासून पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य करत आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 26, 2025 | 09:20 AM
मोठी बातमी! बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्करावर BLA चा हल्ला; १० सैनिक ठार
Follow Us
Close
Follow Us:

क्वेटा : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम याठिकाणी दहशतवाद्यांनी भारतीय नागरिकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २८ जणांचा बळी गेला. या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.  हा हल्ला ताजा असतानाच आता बलुच आर्मीने पाकिस्तानावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.  बलुचिस्तानमधील मार्गट परिसरात शुक्रवारी झालेल्या  स्फोटक हल्ल्यात पाकिस्तानच्या लष्कराचे किमान १० जवान ठार झाल्याची माहिती आहे.  (Pahalgam Terror Attack)

या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) स्वीकारली असून, रिमोट-कंट्रोल्ड आयईडी (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस) चा वापर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. बीएलएने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही पाकिस्तानी (Pakistan)  लष्कराच्या वाहनावर टार्गेटेड आयईडी हल्ला केला असून, वाहन पूर्णपणे नष्ट झाले आहे.” हल्ल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

SRH vs CSK : CSK विरुद्ध Mohammad Shami ची विक्रमाला गवसणी, असा पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच गोलंदाज

मार्गट हे बलुच बंडखोरीचे दीर्घकालीन केंद्र मानले जाते. येथे याआधीही अनेक वेळा सुरक्षा दलांवर हल्ले झाले आहेत. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी बीएलए ही गट अनेक वर्षांपासून पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य करत आहे. या हल्ल्यावर अद्याप पाकिस्तानी लष्कराकडून कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया किंवा विधान आलेले नाही. मात्र, परिस्थितीचा अंदाज घेता सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

बीएलएचचे (BLA) प्रवक्ते झियांद बलोच कडून एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. “कब्जा करणाऱ्या सैन्याविरुद्ध आमचे हल्ले पूर्ण ताकदीने सुरू राहतील.पाकिस्तानी (Pakistan) सैन्याच्या ताफ्यावर रिमोट-कंट्रोल्ड आयईडीने हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये शत्रूचे एक वाहन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि त्यातील सर्व १० सैनिक ठार झाले. मृतांमध्ये सुभेदार शहजाद अमीन, नायब सुभेदार अब्बास, शिपाई खलील, शिपाई जाहिद, शिपाई खुर्रम सलीम आणि इतर सैनिकांचा समावेश होता.” असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आक्रमक; सैन्यदलेही सज्ज, आता काहीतरी मोठं घडणार?

BLA म्हणजे काय?

बलुच लिबरेशन आर्मीची (BLA) स्थापना १९७० च्या दशकात झाली होती पण ही संघटना काही काळासाठी बंद पडली. २००० मध्ये त्यांनी पुन्हा एकदा स्वतःला स्थापित केले. बलुचिस्तानमधील अनेक लोकांचा असा विश्वास आहे की भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर त्यांना एक वेगळा देश म्हणून राहायचे होते, परंतु त्यांच्या संमतीशिवाय त्यांना पाकिस्तानात समाविष्ट करण्यात आले. बलुच लिबरेशन आर्मी सतत स्वातंत्र्याची मागणी करत आहे आणि पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीएलएकडे ६००० हून अधिक लढाऊ आहेत, ज्यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय मानली जाते.

Web Title: Big news bla attacks pakistani army in balochistan 10 soldiers killed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 08:52 AM

Topics:  

  • india
  • indian army
  • pakistan

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट
3

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
4

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.