राजधानी काबूलमध्ये स्फोट (फोटो- istockphoto)
नवी दिल्ली: अफगणिस्तानमध्ये सध्या तालिबानचे राज्य आहे. तेथील नागरिकांवर तालिबानी सरकारची सत्ता आहे. दरम्यान अफगणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एक स्फोट झाला आहे. हा स्फोट अफघणिस्तानच्या निर्वासित मंत्रालयाच्या परिसरात हा स्फोट झाला आहे. या स्फोटाची भीषणता मोठी असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये तालिबानच्या एक मंत्र्यांसाह अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.
अफघणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एक मोठा स्फोट झाला आहे. त्यामध्ये 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट निर्वासित मंत्रालयाच्या परिसरात झाला आहे. या स्फोटामध्ये तालिबान सरकारचे मंत्री खलील रहमान हक्कानी यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांचा अंगरक्षक आणि 12 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. तालिबान सरकारमधील मंत्री खलील रहमान हक्कानी हे खोस्तमधून येणाऱ्या लोकांना होस्ट करत असताना हा स्फोट झाला. तालिबान सरकारने याबाबत माहिती दिल्याचे समोर आले आहे.
राजधानी काबूलमध्ये मंत्रालय परिसरात हा स्फोट झाल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. हा स्फोट कोणी घडवून आणला त्याबद्दल अजून खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही. या स्फोटात हल्लेखोर देखील मारला गेल्याचे वृत्त समोर येत आहे. स्फोटांमुळे जवळच्या परिसरातील अनेक जण जखमी झाल्याचे बोलले जात आहे. या स्फोटात कोणत्या संघटनेचा हात आहे, याचा तपास तालिबान सरकारने सुरू केला आहे.
तालिबानचा आणखी एक तानाशाही निर्णय
तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. अफगाण महिलांचे अनेक अधिकार काढून घेण्यात आले आहेत. त्यातील मुख्य अधिकार म्हणजे शिक्षण. तालिबानने अफगाण महिलांना शिक्षण घेण्यास बंदी घातली आहे. याच पार्श्वभूमीवर तालिबानने आणखी एक तानाशाही निर्णय घेतला आहे. त्यांनी अफगाण महिलांना मिडवाइफरी ( दाई) म्हणून काम करण्यास आणि नर्सिंगचे शिक्षण घेण्यास बंदी घातली आहे.
अफगाण महिलांसाठी शिक्षणाचे दार पूर्णपणे बंद
मीडिया रिपोर्टनुसार, महिलांसाठी शिक्षण घेण्याचे हे दोन्ही मार्ग देखील आता तालिबानने बंद केल्याने अफगाण महिलांसाठी शिक्षणाचे दार पूर्णपणे बंद झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमध्ये सध्या आरोग्य व्यवस्था गंभीर परिस्थितीत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 मध्ये जाहीर केले होते की, देशाला गरजा भागवण्यासाठी किमान 18,000 दाईंची आवश्यकता आहे. परंतु, दाई बनण्यासाठी किंवा नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या महिलांना वर्गात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
हेही वाचा: तालिबानचा आणखी एक तानाशाही निर्णय; महिलांना नर्सिंगचे शिक्षण घेण्यापासून बंदी
तालिबानने पुढील आदेशापर्यंत हे शिक्षण बंद ठेवण्यास सांगितले आहे. पण, तालिबान सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तालिबान सरकारने वचन दिले होते की, अभ्यासक्रम इस्लामिक तत्वांशी सुसंगत बनवून नंतर शिक्षण पुन्हा सुरू केरण्यात येईल. मात्र, 2021 पासून किशोरवयीन मुलींना शिक्षणापासून अद्यापही वंचित ठेवण्यात आले आहे.
आता दाई किंवा नर्सिंग शिक्षण घेणे हे महिलांसाठी शिक्षणाचे एकमेव पर्याय होते. मात्र, हे पर्यायही बंद करण्यात आले आहेत. अफगाणिस्तान महिलांवर उपचार करण्यासाठी पुरुष डॉक्टरांना पुरुष संरक्षकाच्या उपस्थितीतच परवानगी आहे. सध्या 17,000 महिला नर्सिंग किंवा दाईचे प्रशिक्षण घेत आहेत. मात्र, तालिबानच्या या निर्णयामुळे या महिलांचे भवितव्य अनिश्चित झाले आहे.