Bomb blast inPakistan's Khyber Pakhtunkhwa, 7 killed, 9 injured
इस्लामाबाद: एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या पेशावर येथे मोठा बॉम्ब स्फोट झाला आहे. पेशावरच्या शांतता समितीच्या कार्यालयाबाहेर सोमवारी (28 एप्रिल) भीषण स्फोट झाला. या बॉम्बस्फोटात सात जण ठार झाले असून 16 जण जखमी झाले आहेत. अशी माहिती खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या पोलिसांनी दिली. या हल्ल्याने पाकिस्तान हादरला असून परिसरात भीतीचे वातावरण आहे. जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर आता पाकिस्तानमध्ये देखील बॉम्बस्फोट झाला आहे.
या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकरालेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट इतका भीषण होता की, यामुळे कार्यालयाची इमारत उद्ध्वस्त झाली असून अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच बचावपथक घटनास्थळी पोहोचले आहे. बाचवकार्य सुरु करण्यात आले आहे. तसेच स्थानिक लोकांनी देखील जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यासाठी मदत दिली आहे. जखमींना जवळच्या रुग्णलायात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये काहींची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. तसेच स्फोटामागील कारण अद्याप स्पष्ट झालेली नाही. सध्या पोलिस आणि सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. सध्या हा स्फोट कोणी केला याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थवरुन पुरावे गोळा करण्यात येत आहे. या स्फोटासाठी जबाबदार असलेल्याचा शोध सुरु आहे. हल्ल्याची वेगवेळ्या पैलूने तपासमी केली जात आहे.
सध्या पाकिस्तान मोठ्या संकटात अडकलेला आहे. एककीडे पहलगाम हल्ल्यानंतर भारतासोबतचा तणाव आणि दुसरीकडे त्यांच्याच देशात हल्ल्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. सध्या पाकिस्तानमध्ये नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या हल्ल्याच्या दोन दिवस आधीच 25 एप्रिल रोजी पाकिस्तानच्या क्वेटा शहरात बॉम्ब हल्ला झाला होता. या हल्ल्यात दहा पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते आणि तीन जण जखमी झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) ने घेतली होती.
जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येते पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना टीआरएफने घेतली. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या सीमापार दहशतवाद पाठिंब्यामुळे भारताने संताप व्यक्त केला आहे.