
Iran Nuclear Secret
अमेरिकेच्या पेंटागॉनच्या या अहवालानुसार, इराणवर अमेरिकेने किंवा इस्रायलने पूर्ण लष्करी क्षमतेने हल्ला केला तरीही इराण आपल्या अण्वस्त्र बनवण्याच्या प्रकल्प थांबवणार नाही. अमेरिकेच्या या अहवालामुळे इस्रायलची अधिक चिंता वाढली आहे. या अहवालात असेही नमूद करण्यता आले आहे की, इराणचे लष्करी तळ, संरक्षण यंत्रणा आणि काही महत्वाच्या सुविधा २२ जून २०२५ मध्ये झालेल्या अमेरिकी हल्ल्यात नष्ट झाल्या आहेत. अमेरिकेने इस्रायल इराण युद्धादरम्यान ऑपरेशन मिडनाईट हॅमर ही मोहिम राबवली होती. या मोहिमेत इराणचे फोर्डो (Fordow), नतान्झ (Natanz) आणि इस्फहान (Isfahan) हे तीन लष्करी तळ उद्ध्वस्त करण्यात आले होते. परंतु अमेरिकेच्या अहवालामुसार, इराणने पुन्हा मोठ्या क्षेमतेने ही तळे उभारली आहे. यामुळे इराणकडून इस्रायलवर अण्वस्त्र हल्ल्याचा धोका अधिक वाढला आहे.
याशिवाय पेंटागॉनने अहवालात असेही सांगितले आहे की, इराणचे प्रॉक्सीगट पुन्हा उभारण्यात येण्याची शक्यता आहे. या अहवालात इराणवर गंभीर आरोप करण्यात आले आहे. अमेरिकेच्या मते, इराण आणि त्याचे प्रॉक्सी गट अमेरिकन नागरिकांच्या मृत्यूसाठी जबाबदार आहे. तसेच सध्या इराण इस्रायलला नष्ट करण्याची योजना आखत असल्याचा इशाराही या अहवालातून देण्यात आला आहे. इराणमुळे मध्यपूर्वेत अस्थिरता निर्माण झाली असून अमेरिकन सैन्याच्या सुरक्षेसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
याच वेळी इराणने अमेरिकेच्या सर्व आरोपांना फेटाळले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी आणि भारतातील इराणी राजदूत डॉ. अब्दुल हकीम यांनी स्पष्ट केले आहे की, इराणने कधीच अण्वस्त्रे बनवण्याची इच्छा ठेवलेली नाही. अण्वस्त्रे बनवणे हे इस्लामध्ये हराम आहे. यामुळे इराणचा अणु कार्यक्रम केवळ शांततेच्या उद्देशासाठी आणि मानवी गरजांसाठी असल्याचा दावा करण्यात आला आहे.